• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. upendra limaye and ranbir kapoor first met on animal movie set pps

“रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा…” उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “अहंकार…”

अभिनेते उपेंद्र लिमये पहिल्यांदा रणबीर कपूरला भेटल्यानंतर काय म्हणाले? जाणून घ्या…

Updated: December 16, 2023 19:52 IST
Follow Us
  • रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबोला सुरू आहे.
    1/12

    रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल स्टारर ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचा सध्या सर्वत्र बोलबोला सुरू आहे.

  • 2/12

    बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जोरदार कमाई करत आहे.

  • 3/12

    या सुपरहिट चित्रपटात १० मिनिटांची भूमिका करून अभिनेते उपेंद्र लिमये चांगलेच भाव खाऊन गेले आहेत.

  • 4/12

    उपेंद्र लिमये यांच्या कामाचं चहूबाजूने कौतुक केलं जात असून सोशल मीडियावर त्यांचा सीन तुफान व्हायरल झाला आहे. (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 5/12

    काही दिवसांपूर्वी उपेंद्र यांनी ‘राजश्री मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलला मुलाखती दिली होती.

  • 6/12

    या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी सांगत काही विधान केली. (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 7/12

    तसेच उपेंद्र यांनी रणबीर कपूरबरोबर झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 8/12

    उपेंद्र लिमये म्हणाले की, “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी त्याला म्हणालो होतो, तू मला खूप आवडतोस. तू स्टार आहेस म्हणून आवडतोस असं नाही. काही चांगले स्टार आणि अभिनेते आहेत, त्यापैकी तू एक आहेस.”

  • 9/12

    उपेंद्र लिमयेंच्या तोंडून कौतुक ऐकून रणबीरने लगेच त्यांचे आभार मानले. (फोटो सौजन्य – जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम)

  • 10/12

    “अजिबात अहंकार नसणाऱ्या अभिनेत्यांपैकी रणबीर कपूर आहे,” असं उपेंद्र लिमये या मुलखातीत म्हणाले.

  • 11/12

    तसेच उपेंद्र लिमये यांनी धाडसाने एक विधान केले. ते म्हणाले होते, “बॉलीवूडचे कलाकार जे स्टार म्हणून आहेत किंवा स्टार म्हणून स्वतःच्या प्रेमात आहेत. ते मी केलेल्या सीनचा विचार पण करणार नाहीत.”

  • 12/12

    “त्यांना दुसरा कोणीतरी वर्चस्व करतोय किंवा दुसरा कोणीतरी आपल्यापेक्षा भाव खाऊन जातोय, हे त्या स्टार लोकांना अजिबात आवडत नाही. अगदी मनापासून सांगायचं झालं, तर हा स्टार आणि अभिनेत्यामधील फरक आहे,” असं उपेंद्र लिमये स्पष्टचं म्हणाले.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actorsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Upendra limaye and ranbir kapoor first met on animal movie set pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.