• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • राज ठाकरे
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. amruta subhash reaction on intimate scene in lust stories 2 with her long time friend shrikant yadav sva

“माझ्या नवऱ्याने त्याला…”, श्रीकांत यादवसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल काय म्हणाली अमृता सुभाष?

‘लस्ट स्टोरीज २’मधील इंटिमेट सीनबद्दल अमृता सुभाषचा खुलासा, म्हणाली…

Updated: December 16, 2023 21:01 IST
Follow Us
  • amruta subhash reaction on intimate scene
    1/15

    अभिनेत्री अमृता सुभाषने मराठीसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

  • 2/15

    अमृता काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज २’मधील ‘द मिरर’ या लघुपटात झळकली होती.

  • 3/15

    ‘द मिरर’चं दिग्दर्शन कोंकणा सेन शर्माने केलं आहे.

  • 4/15

    या लघुपटात अमृताने घरकाम करणाऱ्या सीमा या महिलेची भूमिका साकारली होती.

  • 5/15

    चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अमृताने साकारलेल्या सीमा या पात्राचं सर्वत्र कौतुक झालं आणि यामुळेच तिला यंदाच्या नेटफ्लिक्स राउंडटेबलसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं.

  • 6/15

    या संवादसत्रात अमृताने ‘द मिरर’ या लघुपटाबाबत अनेक खुलासे केले.

  • 7/15

    यामध्ये अमृतासह तिलोत्तमा शोम व श्रीकांत यादव प्रमुख भूमिकेत झळकले होते.

  • 8/15

    ‘द मिरर’मध्ये ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारणारे अभिनेते श्रीकांत व अमृता खऱ्या आयुष्यात एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

  • 9/15

    अमृता सुभाष व श्रीकांतचे काही इंटिमेट सीन्स या लघुपटात आहेत. अनेक वर्ष एकमेकांचे चांगले मित्र तसेच दोघांची कौटुंबिक ओळख असल्याने दोघंही सीन्स वाचून फार अस्वस्थ होते.

  • 10/15

    अमृताने स्क्रिप्ट वाचून दिग्दर्शिका कोंकणा सेन शर्माकडे काही वेळ मागितला होता.

  • 11/15

    नेटफ्लिक्सच्या राउंडटेबल चर्चासत्रात अभिनेत्री म्हणाली, “तुझ्याबरोबर असे सीन्स मी करू शकत नाही असं श्रीकांतचं म्हणणं होतं. पण, त्यावेळी माझा नवरा संदेश कुलकर्णी जो स्वत: एक उत्तम अभिनेता आणि श्रीकांतचा खूप चांगला मित्र आहे. त्याने आम्हाला दोघांना समजावलं.”

  • 12/15

    “तू एकदम उत्तम काम करशील असं सांगत माझ्या नवऱ्याने श्रीकांतला धीर दिला अन् तो तयार झाला.” असं अमृताने सांगितलं.

  • 13/15

    “‘लस्ट स्टोरीज २’ प्रदर्शित झाल्यावर माझ्या ऑनस्क्रीन नवऱ्याची भूमिका कोणी साकारली याबद्दल मला अनेकांनी मेसेज करून विचारलं आणि श्रीकांतचं कौतुक केलं” असं अमृताने या मुलाखतीत सांगितलं.

  • 14/15

    ‘लस्ट स्टोरीज २’मधील भूमिकेसाठी तिला नुकताच फिल्मफेअर ओटीटीचा अवार्ड मिळाला.

  • 15/15

    दरम्यान, अमृता सुभाषच्या कामाबद्दल सांगायचं, झालं तर ‘लस्ट स्टोरीज २’च्या आधी तिने ‘देव’, ‘रमन राघव २.०’, ‘गली बॉल’, ‘धमाका’ अशा चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. (सर्व फोटो सौजन्य : अमृता सुभाष इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Amruta subhash reaction on intimate scene in lust stories 2 with her long time friend shrikant yadav sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.