• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar why hate cooking pps

‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर स्वयंपाकापासून राहते लांब, कारण सांगत म्हणाली, “ओट्याजवळ उभं राहिलं तरी…”

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला स्वयंपाक का आवडत नाही? जाणून घ्या…

Updated: December 18, 2023 13:02 IST
Follow Us
  • गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते.
    1/12

    गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते.

  • 2/12

    मधुराणी तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती आता कवितेमुळे देखील चर्चेत असते.

  • 3/12

    अशी लोकप्रिय आणि चर्चेत असणारी मधुराणी स्वयंपाकापासून नेहमी लांबचं राहते. तिला स्वयंपाकाचा तिटकारा आहे.

  • 4/12

    अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने काही दिवसांपूर्वी ‘बिंगेपॉडस मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिने स्वयंपाकाचा तिटकारा का निर्माण झाला? याविषयी सांगितलं.

  • 5/12

    मधुराणीला या मुलाखतीमध्ये विचारलं होतं की, कविता जसा तुझ्या मनाचा हळवा कोपरा आहे. तशीच काही माणसं देखील तुझ्या मनाचा हळवा कोपरा असतील. तर तुझ्या मुली व्यतिरिक्त कोण आहे?

  • 6/12

    मधुराणी म्हणाली, “माझी आई. ती शास्त्रीय संगीत गायिका आहे. तिने वयाच्या ६५व्या वर्षी पीएचडी केली. आपण आपल्या आईकडून स्त्रीपण शिकतं असतो. बाईपण शिकतं असतो. मी तिला बघत मोठी झालीये.”

  • 7/12

    “तिची कलेप्रतीची तळमळ मी पाहिली आहे. तिचा ध्यास पाहिला आहे आणि ते पाहत असताना मी हे देखील पाहिलं की, मला काय करायचं नाही. जे माझ्या आईने केलंय. तिने स्वतःला संसारात गाडून घेतलं,” असं मधुराणी म्हणाली.

  • 8/12

    पुढे मधुराणी म्हणाली, “माझे वडील दुपारी तीन, साडे तीनला घरी परत यायचे. आमचा विड्याच्या पानांचा हॉलसेल गाला होता. तिथे ते मंडईत जायचे आणि आम्ही तुळशी बागेत राहायचो. ते पाच मिनिटांत घरी पोहोचायचे. त्या पद्धतीने जेवणं व्हायचं.”

  • 9/12

    “ती फोन करायची, काय जेवण करायचं वगैरे. मग बाबा तिकडून फर्माइश करायचे. मग ते येण्याआधी ती बनवायला घेणार, त्यांना ते गरम गरम वाढणार आणि मग रोज तिला ते कुतुहल, उत्सुकता असायची, नवऱ्याला आवडलंय का? आईचा बराच वेळ स्वयंपाक घरात जायचा. घरातली काम करण्यातच जायचा,” असं मधुराणीने सांगितलं.

  • 10/12

    पुढे मधुराणीने सांगितलं, “मी तिला एकेदिवशी म्हटलं, तू काय पातळीची गायिका आहे हे तुला कळतं का? तू यातल्या गोष्टी नाही केल्यात तर चालणार आहे, संसार चालतो. पण त्याकाळातली परिस्थितीची अशी होती, लोकं काय म्हणतील. मुलीकडे दुर्लक्ष करून मी गायतेय. मला मुली वाढवायच्या आहेत. नवऱ्याला मला गरमचं वाढायचं आहे.”

  • 11/12

    “मी म्हटलं, तू स्वयंपाक १२ वाजायच्या आत करना. म्हणजे ते येईपर्यंत तुला रियाज करता येईल. मला हे सगळं आठवी-नववी पासूनचं कळतं होतं. त्यामुळे गंमत अशी झाली की, मला स्वयंपाक या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला,” असं मधुराणी म्हणाली.

  • 12/12

    “लोकांना स्वयंपाक करणं तणावमुक्तीचं माध्यम वाटत असेल, पण मला ओट्याजवळ उभं राहिलं तरी तणाव येतो. मला असं वाटतं हे कोणीतरी करू शकत. हे मी नाही करायला पाहिजे. नाहीतर मी याच्यात अडकून राहील. याविषयी माझ्या मनात भीती निर्माण झालीये. हे जर मी करायला लागले आणि रमले ना तर हे घातक आहे. मी हेच करत राहीन,” असं मधुराणी म्हणाली.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी मालिकाMarathi Serials

Web Title: Aai kuthe kay karte fame madhurani prabhulkar why hate cooking pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.