• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. animal fame upendra limaye praised by marathi actors for his outstanding performance sva

‘अ‍ॅनिमल’ पाहिल्यावर उपेंद्र लिमयेंना मराठी कलाकारांनी केले फोन; किस्सा सांगत म्हणाले, “सई ताम्हणकर अन्…”

अभिनेते उपेंद्र लिमयेंना ‘अ‍ॅनिमल’ पाहिल्यावर मिळाल्या ‘अशा’ प्रतिक्रिया, म्हणाले…

December 22, 2023 09:21 IST
Follow Us
  • animal fame upendra limaye praised by marathi actors
    1/15

    संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ( फोटो सौजन्य : संदीप रेड्डी वांगा इन्स्टाग्राम )

  • 2/15

    चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ( फोटो सौजन्य : संदीप रेड्डी वांगा इन्स्टाग्राम )

  • 3/15

    ‘अ‍ॅनिमल’मध्ये मराठी अभिनेते उपेंद्र लिमये महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. ( फोटो सौजन्य : उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम )

  • 4/15

    फ्रेडी पाटील या शस्त्रसाठा पुरवणाऱ्या डिलरची भूमिका त्यांनी चित्रपटात साकारली आहे. ( फोटो सौजन्य : जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम )

  • 5/15

    उपेंद्र लिमयेंच्या एन्ट्रीला चित्रपटगृहांमध्ये एक वेगळाच माहोल तयार होत असल्याचं सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ( फोटो सौजन्य : उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम )

  • 6/15

    ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून उपेंद्र यांना अनेक मराठी कलाकार व निर्मात्यांचे फोन आल्याचं त्यांनी अलीकडच्या काही मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. ( फोटो सौजन्य : जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम )

  • 7/15

    चित्रपट पाहिल्यावर अभिनेता संदीप पाठकने उपेंद्र लिमयेंना फोन केला आणि पुढे तो अर्धा तास त्यांच्याशी चर्चा करत होता. ( फोटो सौजन्य : संदीप पाठक इन्स्टाग्राम )

  • 8/15

    उपेंद्र लिमये याविषयी सांगताना म्हणाले, “संदीप मला म्हणाला, अरे उप्या तो चित्रपट पाहून मी कुठेतरी मागे पडलोय असं मला वाटलं. संदीपने अत्यंत प्रांजळपणे त्याला दडपण (कॉम्प्लेक्स) आल्याचं मान्य केलं आणि त्याच्या प्रामाणिकपणाचं मला फारचं कौतुक वाटलं.” ( फोटो सौजन्य : उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम )

  • 9/15

    संदीपप्रमाणे अभिनेत्री सई ताम्हणकर व काही मराठी निर्मात्यांनी देखील उपेंद्र लिमयेंना त्यांचं कौतुक करण्यासाठी फोन केले होते. ( फोटो सौजन्य : सई ताम्हणकर इन्स्टाग्राम )

  • 10/15

    एका मराठी निर्मात्याची प्रतिक्रिया सांगताना उपेंद्र लिमये म्हणाले, “तो निर्माता मला म्हणाला, अरे तुझी लोकप्रियता एवढी असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. कलाकाराच्या अभिनयाने लोक आनंदी होतात हा भाग वेगळा…पण, तुझ्या नुसत्या एन्ट्रीनेच प्रेक्षक वेडे होतात. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी शॉकिंग होत्या.” ( फोटो सौजन्य : उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम )

  • 11/15

    मराठी कलाविश्वातून अशा विविध प्रतिक्रिया आल्याचं उपेंद्र लिमयेंनी सांगितलं. ( फोटो सौजन्य : संदीप रेड्डी वांगा इन्स्टाग्राम )

  • 12/15

    याशिवाय उपेंद्र लिमयेंचे जवळचे नातेवाईक आणि त्यांच्या मुलांच्या मित्रमंडळींनी देखील ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटासाठी त्यांचं भरभरून कौतुक केलं. ( फोटो सौजन्य : उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम )

  • 13/15

    चाहत्यांकडून मिळणाऱ्या विविध प्रतिक्रियांविषयी उपेंद्र लिमये सांगतात, “आयुष्यात कधीही नकारात्मक प्रतिक्रियांनी खचून जायचं नसतं आणि चांगल्या सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या म्हणून स्वत:ला मोठं समजायचं नसतं. जे कौतुक करतात त्यांचा मी कायम आभारीच आहे.” ( फोटो सौजन्य : संदीप रेड्डी वांगा इन्स्टाग्राम )

  • 14/15

    यापूर्वी देखील अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. ( फोटो : जितेंद्र भोसले व उपेंद्र लिमये इन्स्टाग्राम )

  • 15/15

    दरम्यान, मराठी कलाविश्वातून सध्या उपेंद्र लिमयेंवर ‘अ‍ॅनिमल’मधील दमदार अभिनयासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. ( फोटो : जितेंद्र भोसले इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actorsसई ताम्हणकरSai Tamhankar

Web Title: Animal fame upendra limaye praised by marathi actors for his outstanding performance sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.