-

अभिनेत्री गौतमी देशपांडे अखेर विवाह बंधनात अडकली आहे. (फोटो – Clickography/Facebook)
-
काही दिवसांपूर्वी तिने तिच्या रिलेशनशिपची घोषणा केली. (फोटो – Clickography/Facebook)
-
तेव्हापासून त्यांच्या विवाह विधी सुरू झाल्या होत्या. (फोटो – Clickography/Facebook)
-
मेंदी, संगीत आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो समोर आल्यानंतर तिच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. (फोटो – गौतमी देशपांडे/Instagram)
-
अखेर गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर विवाहबद्ध झाले आहेत. (फोटो – गौतमी देशपांडे/Instagram)
-
लग्नासाठी कोणताही भडक रंग न निवडता त्यांनी ऑफ व्हाईट आणि पिच रंग म्हणजे अबोली रंग निवडला आहे. (फोटो – गौतमी देशपांडे/Instagram)
-
गौतमीने ऑफ व्हाईट रंगाच्या साडीवर पिच रंगाचा ब्लाऊज आणि पिच रंगाचाच शेला घेतला आहे. (फोटो – गौतमी देशपांडे/Instagram)
-
तर, स्वानंद तेंडुलकरनेही तसाच रंग मॅच केला आहे. ऑफ व्हाईट रंगाच्या सदऱ्यावर त्याने पिच रंगाचा शेला घेतला आहे. तसंच, लग्न मंडपाचं डेकोरेशनही अशाच पद्धतीने सजवण्यात आलं.(फोटो सौजन्य – पॉला मॅग्लिन इन्स्टाग्राम)
-
या लग्नासाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. (फोटो – गौतमी देशपांडे/ Instagram)
-
मराठी कलाकार सध्या गौतमी-स्वानंदला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – सारंग साठे इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्र मृण्मयी ही गौतमीची मोठी बहिण आहे. तीही अनेक फोटोंमध्ये सुंदर दिसतेय. (फोटो – मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
-
गौतमी आणि स्वानंदीची सगळेच फोटो अत्यंत गोड आले आहेत. (फोटो – गौतमी देशपांडे / इन्स्टाग्राम)
PHOTOS : ऑफ व्हाईटला अबोलीची साथ, गौतमी आणि स्वानंदच्या लग्नातील शालू आणि शेरवानीचं अनोखं कॉम्बिनेशन पाहाच!
गौतमी देशपांडे अभिनेता स्वानंद तेंडुलकरबरोबर विवाहबद्ध झाली आहे. या दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून लग्नातील त्यांच्या कलर कॉम्बिनेशनची प्रचंड चर्चा सुरू आहे.
Web Title: Gautami deshpande and swanand tendulkar wedding dreess off white and pitch color combination sgk