-

नेटफ्लिक्सवर आलेली सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज आजही लोकांच्या लक्षात आहे. अनुराग कश्यपचं दिग्दर्शन, नवाजुद्दीनचा अभिनय आणि अभिनेत्रींचे बोल्ड सीन यामुळे ही वेब सीरिज लक्षात राहिली आहे. यात काम केलेल्या मराठी अभिनेत्रीने आता खंत व्यक्त केली आहे. (सर्व फोटो सौजन्य-राजश्री देशपांडे, इंस्टाग्राम पेज)
-
ही अभिनेत्री म्हणजे राजश्री देशपांडे, राजश्रीने सेक्रेड गेम्समधल्या त्या एका सीननंतर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच कसा बदलला हे सांगितलं आहे.
-
राजश्रीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमधून काम केलं आहे. ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या सत्यशोधक या चित्रपटात राजश्रीने सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे.
-
सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील नवाजुद्दीनसोबतचा इंटिमेट सीन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मला “पोर्न अॅक्टर” चा टॅग देण्यात आला होता, असं राजश्री देशपांडेनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
-
राजश्री म्हणाली माझा आणि नवाजचा तो सीन फक्त व्हायरल झाला नाही तर तो मॉर्फ करुन त्याचा गैरवापरही केला गेला. माझ्याविषयी तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या गेल्या.
-
राजश्री पुढे म्हणाली, “नवाज सुद्धा त्या सीरिजचा भाग होता, त्याला कोणी प्रश्न विचारला नाही, कोणी अनुराग कश्यपलाला देखील प्रश्न विचारले नाही की, तू हा सीन का केलास? असा प्रश्न फक्त मलाच विचारला गेला. अनेकांनी मला ‘पॉर्न अभिनेत्री हा टॅग दिला. अशी खंतही राजश्रीने बोलून दाखवली.
-
आजही मला जे ओळखलं जातं ते ‘सेक्रेड गेम्स’ची अभिनेत्री म्हणूनच. ‘ट्रायल बाय फायर’ या माझ्या वेब सीरिजमधल्या माझ्या भूमिकेला सेक्रेड गेम्सच्या सुभद्रा एवढी एवढी प्रसिद्धी मिळाली नाही.”, असंही राजश्रीनं सांगितलं.
-
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजश्रीने सांगितलं की, ती इंटिमेट दृश्यांच्या चित्रीकरणादरम्यान अजिबात अस्वस्थ नव्हती. ती सीन शूट करताना कम्फर्टेबल आहे की नाही याची नवाजुद्दीनने खात्री केली होती. ती म्हणाली, “मला आनंद आहे की, मला सुभद्रा ही भूमिका करायला मिळाली कारण ती गायतोंडेच्या आयुष्यातील एक महत्त्वाची भूमिका आहे.”
-
सेक्रेड गेम्समुळे राजश्रीला प्रसिद्धी मिळाली. तसंच ती सुभद्राच्या भूमिकेत अत्यंत चपखल बसली त्यामुळे तिचं वेगळेपण लक्षातही राहिलं.
-
राजश्री देशपांडे सोशल मीडियाव खूप सक्रिय आहे. तिचे विविध फोटो ती पोस्ट करत असते.
“सेक्रेड गेम्समधल्या नवाजुद्दीन बरोबरच्या ‘त्या’ सीनमुळे ‘पॉर्न अभिनेत्री’चा टॅग लागला”, मराठी अभिनेत्रीची खंत
जाणून घ्या सेक्रेड गेम्स या गाजलेल्या वेबसीरिजमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीने नेमकी काय खंत व्यक्त केली आहे?
Web Title: Bollywood actress rajshri deshpande talk about intimate scenes in sacred games and porn actress stamp on her scj