• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. deepika padukone first movie om shanti om voice was dubbed by mona ghosh shetty is deepika born in india unknown facts svs

दीपिका पदुकोणच्या पहिल्या चित्रपटात तिचा आवाज बनली होती ‘ही’ कलाकार; शांतीप्रियाची न ऐकलेली कहाणी

Deepika Padukone Facts: तुम्हाला माहित आहे का, दीपिकाची कर्मभूमी भारत असली आणि तिचे कुटुंब जरी भारतीय असले तरी अभिनेत्रीचा जन्म भारतात झालेला नाही.

January 8, 2024 12:41 IST
Follow Us
  • Deepika Padukone First Movie Om Shanti Om Voice Was Dubbed By Mona Ghosh Shetty Is Deepika Born In India Unknown Facts
    1/9

    Deepika Padukone: बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्या आहेत. ३८ वर्षीय अभिनेत्रीने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.

  • 2/9

    पण तुम्हाला माहित आहे का, दीपिकाची कर्मभूमी भारत असली आणि तिचे कुटुंब जरी भारतीय असले तरी अभिनेत्रीचा जन्म भारतात झालेला नाही. प्राप्त माहितीनुसार दीपिकाचा जन्म ५ जानेवारी १९८६ साली डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये झाला होता.

  • 3/9

    दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे प्रसिद्ध भारतीय बॅडमिंटनपटू आहेत. तर आई उज्ज्वला या एक ट्रॅव्हल एजंट आहेत. दीपिका १ वर्षाची असताना पदुकोण कुटुंब डेन्मार्कमधून भारतात आले होते

  • 4/9

    हिमेश रेशमियाच्या ‘आप का सुरूर’ हा अल्बममधून मनोरंजन क्षेत्रात पहिल्यांदा दीपिकाची झलक दिसली होती. ‘नाम है तेरा तेरा’ या गाण्यात दीपिका दिसून आली होती. अनेक वर्षे दीपिकाने मॉडेलिंग केल्यावर २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऐश्वर्या’ कन्नड चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले होते

  • 5/9

    २००७ मध्ये दीपिकाला बॉलिवूडमध्ये किंग खान शाहरुखसह सर्वात मोठा ब्रेक मिळाला होता. ‘ओम शांती ओम’ या सुपरहिट चित्रपटातून दीपिकाने हिंदी सिनेमांमध्ये पदार्पण केले

  • 6/9

    या चित्रपटाविषयी आणखी एक खास बाब म्हणजे ओम शांती ओममध्ये दीपिकाचा मूळ आवाज वापरला गेला नव्हता. तिचा आवाज डब करण्यात आला होता

  • 7/9

    या चित्रपटाचे पूर्ण शूटिंग सिंक साउंडमध्ये करण्यात आले होते. सुरुवातीला फराह खानने दीपिकाचा आवाज डब केल्याच्या चर्चा अफवा म्हणून फेटाळून लावल्या होत्या. मात्र २०१५ मध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट मोना घोष शेट्टी हिने आपणच दीपिकाचा आवाज डब केल्याचे सांगितले होते.

  • 8/9

    ओम शांती ओमच्या यशाने दीपिकाला रातोरात स्टार बनवले होते. शांतीप्रिया म्हणून समोर आलेली दीपिका तेव्हापासून बॉलिवूडच्या प्रेक्षकांना इतकी प्रिय झाली ही आज ती बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे

  • 9/9

    दीपिकाचा आगामी चित्रपट फायटर सुद्धा यंदा २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हृतिक रोशनसह दीपिकाचे काही बोल्ड फोटो या सिनेमाच्या टीजरनंतर चर्चेत आले होते. (Photos Source: @deepikapadukone/instagram)

TOPICS
दीपिका पदुकोणDeepika PadukoneबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Deepika padukone first movie om shanti om voice was dubbed by mona ghosh shetty is deepika born in india unknown facts svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.