-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेमुळे अभिनेत्री गिरीजा प्रभू घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
-
आपल्या अभिनयाच्या जोरावर गिरीजाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
करिअरबरोबरच गिरीजाने तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील उंच भरारी घेतली आहे.
-
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी गिरीजाने हक्काचं घर खरेदी केलं आहे.
-
इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत गिरीजाने ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली.
-
गिरीजाने नव्या घराच्या दारावर लावलेली खणाची डिझाइन असलेली नेमप्लेट सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेते.
-
या आयताकृती नेमप्लेटवर मध्यभागी ‘गिरीजा प्रभू’ हे नाव पांढऱ्या अक्षरात लिहिण्यात आलं आहे. याशिवाय नेमप्लेटला खालील बाजूने घुंगरांची आकर्षक डिझाइन करण्यात आलेली आहे.
-
मार्गशीष महिन्यात घरच्या घरी पूजा करत गिरीजाने या नव्या घराची गूडन्यूज सर्वांना दिली होती.
-
सध्या अभिनेत्रीच्या घराबाहेरील या हटके नेमप्लेटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय मनोरंजन विश्वातील कलाकार गिरीजावर नव्या घरासाठी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू इन्स्टाग्राम )
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम गिरीजा प्रभूने २४ व्या वर्षी घेतलं हक्काचं घर! दारावरच्या हटके नेमप्लेटने वेधलं लक्ष
मालिकाविश्व गाजवणाऱ्या गिरीजा प्रभूने घेतलं नवीन घर! दारावरची सुंदर नेमप्लेट पाहिलीत का?
Web Title: Sukh mhanje nakki kay asta fame actress girija prabhu bought new home unique nameplate grabs attention sva 00