• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. maharashtrachi hasyajatra team reaction on prasad oak party in new house pps

Photos: प्रसाद ओकने नव्या घरात दिलेल्या पार्टीनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांची होती ‘ही’ प्रतिक्रिया

प्रसाद ओकच्या जंगी पार्टीविषयी हास्यजत्रेचे कलाकार काय म्हणाले? जाणून घ्या…

Updated: March 20, 2024 11:00 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (फोटो सौजन्य - पृथ्वीक प्रताप इन्स्टाग्राम)
    1/12

    छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या कार्यक्रमाने मराठी मनोरंजनसृष्टीला अनेक गुणी कलाकार दिले. गौरव मोरे, ओंकार राऊत, वनिता खरात, निखिल बने, निमिष कुलकर्णी, शिवाली परब या सर्वांनी आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (फोटो सौजन्य – पृथ्वीक प्रताप इन्स्टाग्राम)

  • 2/12

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा एक मोठा चाहता वर्ग आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षक या कार्यक्रमातील कलाकारांवर भरभरून प्रेम करत आहेत. अलीकडेच या कार्यक्रमाच्या टीमचा ऑस्ट्रेलिया दौरा झाला. याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. (फोटो सौजन्य – पृथ्वीक प्रताप इन्स्टाग्राम)

  • 3/12

    या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर हास्यजत्रेचा परीक्षक प्रसाद ओकने संपूर्ण टीमसाठी नव्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला हास्यजत्रेमधील प्रत्येक कलाकाराने हजेरी लावली होती. सध्या हे कलाकार या पार्टीचे फोटो शेअर करून प्रसादच्या नव्या घराचं, पार्टीचं कौतुक करत आहेत. (फोटो सौजन्य – प्रसाद ओक इन्स्टाग्राम)

  • 4/12

    अभिनेत्री नम्रता संभेरावने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रसाद व मंजिरी ओकसहचा फोटो शेअर करून लिहिलं आहे, “सुंदर घर, अशा रितीने ओकांची पार्टी सुफळ संपूर्ण.” (फोटो सौजन्य – नम्रता संभेराव इन्स्टाग्राम)

  • 5/12

    तर पृथ्वीक प्रतापने देखील प्रसाद व मंजिरीसहचा फोटो शेअर करून “अखेर पार्टी मिळाली”, असं लिहिलं आहे. (फोटो सौजन्य – पृथ्वीक प्रताप इन्स्टाग्राम)

  • 6/12

    अभिनेत्री चेतना भटनेही प्रसाद ओकच्या नव्या घरातील पार्टीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर तिने लिहिलं आहे, “सुंदर घर…कमाला पार्टी.” (फोटो सौजन्य – चेतना भट इन्स्टाग्राम)

  • 7/12

    तसेच रसिका वेंगुर्लेकरने प्रसाद ओकची पोस्ट इन्स्टाग्राम शेअर करून लिहिलं आहे, “अखेर पार्टी मिळाली. खूप प्रेम प्रसाद, मंजिरी, मयांक, मस्कारा.” (फोटो सौजन्य – रसिका वेंगुर्लेकर इन्स्टाग्राम)

  • 8/12

    अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील प्रसाद ओकेची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यावर प्राजक्ताने लिहिलं आहे, “बहुप्रतीक्षित पार्टी अखेर प्रसाद ओकने दिली. सुंदर घर आणि खूप प्रेम.” (फोटो सौजन्य – प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

  • 9/12

    अभिनेता समीर चौघुले यांनीही प्रसाद ओकच्या पार्टीनंतर सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. “अखेर आमच्या प्रसाद सरांनी पार्टी दिली…आमचा हक्काचा विनोद लोप पावला…आपल्या माणसांचे घरपण असणारे अत्यंत सुंदर घर…खूप अभिमान आणि प्रेम.” (फोटो सौजन्य – समीर चौघुले इन्स्टाग्राम)

  • 10/12

    तसेच प्रसाद खांडेकरने सुद्धा इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट लिहिली आहे. प्रसाद व मंजिरीबरोबरचा फोटो शेअर करून त्याने लिहिलं आहे की, “सकारात्मकता देणारी नवीन जागा…खूपच सुंदर घर सजवलं आहे…प्रसाद दा आणि मंजू ताई तुमच्यावर ईश्वराचे सदैव आशीर्वाद राहो…खूप प्रेम.” (फोटो सौजन्य – प्रसाद खांडेकर इन्स्टाग्राम)

  • 11/12

    अभिनेता प्रथमेश शिवलकरने इन्स्टाग्रामवर पार्टीचा फोटो शेअर करून प्रसाद व मंजिरीचे आभार मानले आणि कमाल पार्टी असं फोटोवर लिहिलं आहे. (फोटो सौजन्य – प्रथमेश शिवलकर इन्स्टाग्राम)

  • 12/12

    सध्या प्रसाद ओकेने हास्यजत्रेच्या टीमला दिलेल्या पार्टीची जोरदार चर्चा होतं आहे. (फोटो सौजन्य – प्रसाद ओके इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेतेMarathi Actorsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Maharashtrachi hasyajatra team reaction on prasad oak party in new house pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.