-
टायगर श्रॉफ सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. यात टायगरबरोबर अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. (फोटो – टायगर श्रॉफ/एफबी)
-
या चित्रपटानंतर टायगर श्रॉफ आणखी काही जबरदस्त अॅक्शनपटांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. (फोटो – टायगर श्रॉफ/इन्टाग्राम)
-
सिंघम अगेन
दिग्दर्शिक रोहित शेट्टीची सुपरहिट फ्रेंचायझी ‘सिंघम’च्या ‘सिंघम अगेन’ या तिसऱ्या भागात टायगर श्रॉफ स्पेशल टास्कर फोर्स अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त सत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो – टायगर श्रॉफ/इन्टाग्राम) -
बागी ४
मीडिया रिपोर्ट्सनुसार टायगर श्रॉफ लवकरच ‘बागी ४’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. (फोटो – टायगर श्रॉफ/इन्टाग्राम) -
रॅम्बो
सात वर्षांपूर्वी ‘रॅम्बो’ या ॲक्शन ड्रामा चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. परंतु, अद्याप या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झालेली नाही. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद ‘रॅम्बो’ या हॉलिवूडपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. यामध्ये टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत असेल. अद्याप या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत किंवा प्रदर्शनाच्या तारखेबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. (फोटो – टायगर श्रॉफ/इन्टाग्राम) -
डेडली
मीडिया रिपोर्ट्सनुसार टायगर श्रॉफ डेडली या आगामी अॅक्शनपटांमध्ये झळकणार असून या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार आहे. (फोटो – टायगर श्रॉफ/इन्टाग्राम) -
डेडली या चित्रपटात जान्हवी कपूर पहिल्यांदाच टायगरबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात वरुण धवन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो – टायगर श्रॉफ/इन्टाग्राम)
‘बडे मियां छोटे मियां’नंतर टायगर श्रॉफ ‘या’ चार अॅक्शनपटांमध्ये झळकणार
टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बडे मियां छोटे मियां’ हा चित्रपट यंदा रमजान ईदच्या मुहुर्तावर म्हणजेच १० एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
Web Title: Tiger shroff upcoming action films after bade miyan chote miyan jshd import asc