• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos chinmay mandlekar who was trolled because of the name jahangir has played the role of chhatrapati shivraya in six films sgk

PHOTOS : ‘जहांगीर’ नावामुळे ट्रोल झालेल्या चिन्मय मांडलेकरने ‘या’ सहा चित्रपटांत साकारली आहे छत्रपती शिवरायांची भूमिका!

मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यामुळे त्याने आता छत्रपती शिवरायांची भूमिक न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्याने याआधी सहा चित्रपटाक शिवरायांची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटांविषयी जाणून घेऊयात.

April 23, 2024 16:45 IST
Follow Us
  • Chinmay-Mandlekar-3
    1/9

    मराठी मालिका, नाटक व चित्रपटांमधून अभिनेता चिन्मय मांडलेकर घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या ‘जहांगीर’ नावावरून अभिनेत्यासह त्याच्या कुटुंबीयांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

  • 2/9

    या ट्रोलिंगला कंटाळून चिन्मय मांडलेकरने यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याआधी सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

  • 3/9

    चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक दिग्पाल लांजेकर यांनी श्री शिवराज अष्टक मालिका सुरू केली आहे. या मालिकेतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या मालिकेतील आतापर्यंत सहा चित्रपट प्रसिद्ध झाले असून या सहाही चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

  • 4/9

    २०१८ साली आलेल्या फर्जंद या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वठवली होती. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं होतं. असंख्य मावळ्यांच्या शौर्याने आणि त्यागाने स्वराज्य स्थापन झाले. यापैकीच एक असलेल्या ‘कोंडाजी फर्जंद’ या शिलेदाराच्या असामान्य शौर्याची कथा ‘फर्जंद’ या मराठी सिनेमात पाहायला मिळाले. या सिनेमाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानांमधील आतापर्यंत समोर न आलेल्या अनेक लढवय्या व्यक्तिरेखा समोर आल्या.

  • 5/9

    २०१९ साली फत्तेशिकस्त हा चित्रपट आला होता. या चित्रपटातही चिन्मय मांडलेकरने शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून उलगडण्यात आला. विशेष म्हणजे आता या चित्रपटाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘मराठा लाइट इन्फान्ट्री’च्या अर्काइव्हमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे.‘फत्तेशिकस्त’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, गनिमीकावा, युद्धापूर्वीची शिस्तबद्ध तयारी, शत्रूची इत्तंभूत माहिती मिळवून त्याला कोंडीत पकडण्याची कला आणि सहकाऱ्यांच्या मदतीने गनिमावर विजय संपादन करण्याचा ध्यास या गोष्टींचं अत्यंत बारकाव्यानिशी चित्रपटामध्ये सादरीकरण करण्यात आलेलं आहे.

  • 6/9

    २०२२ मध्ये आलेल्या पावनखिंड चित्रपटातही चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. मराठा योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी पावनखिंडीत दिलेल्या लढ्यावर आधारित हा चित्रपट होता.

  • 7/9

    तर, २०२२ मध्येच आलेल्या शेर शिवराज या चित्रपटातही चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे दाखवण्यात आलं आहे.

  • 8/9

    २०२३ मध्ये सुभेदार हा चित्रपटही आला होता. यातही त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे आणि त्यांनी लढलेली कोंढाण्याची लढाई हा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला आहे.

  • 9/9

    शिवरायांचा छावा हा चित्रपट यावर्षीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातही चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आला होता.

TOPICS
चिन्मय मांडलेकरChinmay MandlekarमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movieमराठी बातम्याMarathi News

Web Title: Photos chinmay mandlekar who was trolled because of the name jahangir has played the role of chhatrapati shivraya in six films sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.