Photos: कृष्णा सिंग आणि गोविंदाच्या नात्यातील अबोला अजूनही कायम; काय आहे यामागचे कारण…
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि कॉमेडियन कृष्णा यांच्यामध्ये २०१६ साली एका गैरसमजामुळे मतभेद झाले होते आणि तेव्हापासून अजूनपर्यंत त्या दोघांच्या नात्यामध्ये अबोला कायम आहे. जाणून घेऊया काय आहे यामागचे कारण.
बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि कॉमेडियन कृष्णा यांच्यामध्ये २०१६ साली एका गैरसमजामुळे मतभेद झाले होते आणि तेव्हापासून अजूनपर्यंत त्या दोघांच्या नात्यामध्ये अबोला कायम आहे.
२०१६ मध्ये अभिनेता गोविंदाने ‘जग्गा जासूस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि कतरिना कैफदेखील मुख्य भूमिकांमध्ये होते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गोविंदा सोनी टीव्हीच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आपल्या पत्नी सुनीता आणि मुलगी टीनासह आला होता.कृष्णाने कलर्स चॅनेलवर ‘कॉमेडी नाईट्स लाइव्ह’चा होस्ट म्हणून आपला नवीन प्रवास सुरू केला होता आणि त्याला अशी अपेक्षा होती की, गोविंदा ‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याच्या शोमध्ये येईल म्हणून त्याला त्याचा मामा गोविंदा याचा सोनी टीव्हीच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशन करण्यासंबंधीचा निर्णय फारसा आवडला नाही.नंतर कृष्णाने सांगितले, ”चार दिवसांपूर्वी मी त्याला मेसेज केला होता; पण मला धक्का बसला, जेव्हा मला कळले की, तो त्याच्या पत्नीसह कपिलसोबत शूटिंग करीत आहेत. मला अशी आशा होती की, तो मला पाठिंबा देईल.”या संदर्भात गोविंदाने आपले मत व्यक्त करीत सांगितले, ”कृष्णानं शोमध्ये केलेल्या टिप्पणीमुळे मी कृष्णावर नाराज झालो होतो. ‘मैने गोविंदा को अपना मामा रखा है’ म्हणजे मी गोविंदाला मामा म्हणून ठेवलं आहे, असा विनोद कृष्णानं माझ्यावर केला होता. कृष्णानं टेलिव्हिजनवर इतरांचा अपमान करून, पैसे कमावले आहेत आणि माझ्याबद्दल त्यानं केलेल्या तशा उपहासात्मक उल्लेखामुळे मी खूप नाराज झालो होतो. मी त्याला सांगितलं की, त्यानं असं वक्तव्य करता कामा नये. कारण ते अपमानास्पद ठरू शकतं.”गोविंदा पुढे म्हणाला, “कृष्णा ज्या प्रकारे सलमान आणि शाहरुखबद्दल बोलतो तेव्हा तो त्यांच्याबद्दल खूप आदर व्यक्त करून बोलतो. तो ‘कलाकाराच्या’ नव्हे, तर एखाद्या व्यक्तीच्या ‘चांगल्या’ वेळेचा आदर करतो. कदाचित मी त्याच्या शोमध्ये तेव्हा जाईन, जेव्हा माझीही वेळ चांगली असेल.”त्यानंतर २०१८ मध्ये गोविंदाची पत्नी सुनीताने कश्मीराच्या सोशल मीडिया ट्विटबाबत आपला राग व्यक्त केला होता. त्या ट्विटमध्ये कश्मीरा गोविंदाचा उल्लेख करीत असल्याचा आरोप सुनीताने केला होता आणि तेव्हा गोविंदा व सुनीता यांनी कृष्णा व कश्मीरा या दोघांशीही संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.लॉकडाऊनदरम्यान कृष्णाने सांगितले की, त्याने गोविंदाला फोन करण्याचा प्रयत्न केला; पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही आणि या गोष्टीचा त्याला त्रास होतो. आमच्यातील गैरसमजामुळे ते माझ्या मुलांना हॉस्पिटलमध्ये भेटायलाही आले नाहीत. माझ्या मुलांपैकी एक मूल प्राणांतिक झुंज देत असतानाही नाही. मी गोविंदाला फोनदेखील केला; पण तरी मला काही उत्तर मिळाले नाही.कृष्णाच्या आरोपांनंतर गोविंदाने सांगितले, ”जेव्हा मी कृष्णाच्या मुलांना भेटायला गेलो होतो तेव्हा आम्हाला बाळांना भेटू दिलं नव्हतं. पण, तरी मी डॉक्टरांची भेट घेतली होती आणि तेव्हा नर्सनं मला सांगितलं की, मुलांची आई म्हणजे कश्मीरा शाहनं बाळांना भेटण्याची परवानगी नाकारली. म्हणून आम्ही लांबूनच बाळांना पाहिलं होतं.”
2/10
त्यानंतर गोविंदाने असे स्पष्ट केले की, त्याला आता कृष्णापासून अंतर राखायला आवडेल आणि त्यानंही तसं करावं, अशी त्याची इच्छा आहे. (all photo credit : Indian express)