-
शिवानी रांगोळे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
या मालिकेत शिवानी रांगोळे, ऋषिकेश शेलार, कविता मेढेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
-
मालिकेत अक्षरा ( शिवानी रांगोळे ) आणि भुवनेश्वरीमध्ये ( कविता मेढेकर ) कायम वाद होत असल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळतं.
-
पण, खऱ्या आयुष्यात या दोघींचं नातं कसं आहे याबद्दल शिवानीने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमधून सांगितलं आहे.
-
शिवानी लिहिते, “आमच्या भूमिकांमुळे आम्ही ऑनस्क्रीन कायम एकमेकींशी भांडत असतो. पण, ऑफस्क्रीन एकदम उलट आहे.”
-
“आम्ही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहोत. एकत्र वेळ घालवणं, मॅचिंग रंगाच्या साड्या नेसणं, दागिने घालवून मिरवणं या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आपण एकत्र खूप छान दिसतो ताई” अशी पोस्ट शिवानीने कविता मेढेकरांसाठी शेअर केली आहे.
-
याशिवाय या पोस्टसह शिवानीने त्यांचे काही सेटवरचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अक्षरा आणि भुवनेश्वरीने गुलाबी रंगाच्या मॅचिंग साड्या, भरजरी दागिने, हातात चुडा असा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
नेटकरी कमेंट्स सेक्शनमध्ये दोघींचही भरभरून कौतुक करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे इन्स्टाग्राम )
गुलाबी साड्या, दागिने अन्…; अक्षरा-भुवनेश्वरीमध्ये ‘असं’ आहे ऑफस्क्रीन नातं, मास्तरीणबाईंनी शेअर केले सेटवरचे फोटो
ऑनस्क्रीन भांडणं पण, ऑफस्क्रीन…; अक्षराने शेअर केले भुवनेश्वरीबरोबरचे खास फोटो
Web Title: Tula shikvin changlach dhada fame shivani rangole and kavita medhekar off screen bonding sva 00