-
रिॲलिटी शो बिग बॉस १६ फेम आणि जगातील सर्वात लहान गायक अब्दू रोजिकचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अब्दू या खास प्रसंगाचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर ही शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अब्दू ७ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे.
-
अब्दूच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या साखरपुड्याच्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या मात्र, काही लोकांनी अब्दूला यासाठी ट्रोलही केले आहे.
-
अब्दूच्या वयाच्या २० व्या वर्षी लग्नाच्या या निर्णयाला काही लोकांनी ‘पब्लिसिटी स्टंट’चे ही नाव दिले आहे. अब्दूला अनेकदा त्याची उंची कमी असल्यामुळे ट्रोल केले जाते. पण, यावेळी या प्रकरणावर अब्दू रोजिकने आपले मत व्यक्त केले आहे.
-
अब्दू म्हणला, “ज्यांनी माझे अभिनंदन केले त्या सर्वांचे आभार, पण चांगली बातमी देण्यासह मला अनेक वाईट गोष्टींना सामोरे जावं लागतं. अनेक लोक माझ्याबद्दल वाईट कमेंट करतात आणि माझ्यावर हसत आहेत. अमीरा आणि तिचे कुटुंब ही हे सर्व कमेंट्स वाचत आहेत.”
-
अब्दू पुढे म्हणाला, “मी अमिराच्या कुटुंबीयांना आमच्या साखरपुड्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्याची विनंती केली होती. पण काही लोक नकारात्मक कमेंट करत आहात. तर लोक म्हणत आहेत की अब्दूचं खरंच लग्न होतंय की हे खोटं आहे.”
-
अब्दुने आपल्या सोशल मीडियाद्वारे विचारले की लोकांना असं का वाटत आहे? तो म्हणाला, “तुम्हाला वाटते की माझी उंची कमी असल्याने मी लग्न करू शकत नाही? मी आनंदी राहू शकत नाही? जगात असे अनेक लोक आहेत जे आंधळे आहेत, चालू शकत नाहीत, हात-पाय नाहीत, पण ते ही विवाहित आहेत”
-
“माझे आरोग्य चांगले आहे याबद्दल मी आभारी आहे. माझी उंची कमी आहे, याचा अर्थ असा नाही की मी लग्न करू शकत नाही. कृपया माझ्या सोशल मीडियावर इतके वाईट कमेंट करू नका, कारण मला त्याचा मानसिक त्रास होतो” असं अब्दु पुढे म्हणाला.
-
आपल्या सोशल मीडियाद्वारे अब्दुने सांगितले की, “उद्या आमची मुले कशी असतील हे कोणालाच माहीत नाही. पण लोकांचे कमेंट, मते आणि विनोद कोणाचे तरी मानसिक नुकसान नक्की करू शकतात. तुम्ही प्रेम करायला शिकलं पाहिजे आणि इतरांनाही शिकवले पाहिजे.”
-
अब्दू पुढे म्हणाले, “एकेकाळी मलाही माझ्या उंचीची लाज वाटायची. माझ्यासारख्या दिसणाऱ्या मुलांना बरेच लोकं लपवून ठेवायचे. पण आता मी आणि माझ्यासारख्या दिसणाऱ्या लोकं खंबीरपणे उभे राहिलो आहोत आणि लोकांना ही आम्हाला स्वीकारावे लागेल.” (फोटो स्त्रोत: @abdu_rozik/instagram)
Photos: बिग बॉस फेम ‘अब्दू रोजिक’ने लग्नावर ट्रोल करणाऱ्यांना केली विनंती; उंचीवर भाष्य करणाऱ्यांना दिले ‘हे’ उत्तर
बिग बॉस १६ मध्ये सहभागी होऊन प्रचंड लोकप्रियता मिळवणारा ताजिकिस्तानचा गायक ‘अब्दु रोजिक’ आता 7 जुलै रोजी त्याची मंगेतर अमीरासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अलीकडेच त्याचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामुळे काही लोकांनी त्याला ट्रॉल केले आहे.
Web Title: Bigg boss fame abdu rozik requests trolls on marriage answered this to commenters on his height arg 02