-
Shahrukh Khan Beverly Hills Mansion: बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान हा चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे यात शंका नाही. शाहरुखला आवडलेला हॉलीवूडच्या बेव्हरली हिल्समध्ये एक भव्य राजवाडा (हॉलिडे होम) सध्या ऑनलाईन चर्चेत आला आहे. (फोटो: आर्किटेक्चरल डायजेस्ट/ Airbnb)
-
२०१९ मध्ये, शाहरुखने Airbnb वर भाड्याने उपलब्ध असलेल्या आलिशान मालमत्तेचे काही फोटो पोस्ट केले होते. (फोटो: आर्किटेक्चरल डायजेस्ट/ Airbnb)
-
आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, बेव्हरली हिल्स लक्झरी Chateau शाही जीवनाचं प्रतीक आहे आणि येथील प्रत्येक कानाकोपरा हा लक्झरी आयुष्याचं प्रतिबिंब आहे. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिला १ लाख ९६ हजार ८९१ रुपये प्रति रात्र या किमतीत भाड्याने घेतला जाऊ शकतो. (फोटो: आर्किटेक्चरल डायजेस्ट/ Airbnb)
-
या राजमहालात विस्तीर्ण जकूझी, भव्य पूल, खाजगी टेनिस कोर्ट यासह सहा प्रशस्त बेडरूम आहेत. सांता मोनिका, रोडीओ ड्राइव्ह आणि वेस्ट हॉलीवूडपासून पाच मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर हा राजमहाल आहे. (फोटो: आर्किटेक्चरल डायजेस्ट/ Airbnb)
-
व्हिलाच्या ड्रॉइंग रूममध्ये बेज सोफा सेट, एक फायरप्लेस आणि एक सुंदर पेंटिंग असलेले बुकशेल्फ आहे. (फोटो: आर्किटेक्चरल डायजेस्ट/ Airbnb)
-
व्हिलाची थीम पांढऱ्या आणि बेज रंगाच्या रंगसंगतीची आहे. अनेक आरशांनी आणि भव्य झुंबरानी घर सजले आहे. बाथरूममध्ये सुद्धा क्लासिक व मॉडर्न बांधकाम शैलीचा संगम पाहायला मिळतो. (फोटो: आर्किटेक्चरल डायजेस्ट/ Airbnb)
-
२०१७ मध्ये, शाहरुखने या व्हिलाविषयी काही आठवणी शेअर केल्या होत्या. शाहरुख म्हणाला होता की, “बाहेरील जगापासून दूर जाण्यासाठी आणि स्वतःसह काही वेळ घालवण्यासाठी घरासारखी जागा नाही. शहरापासून काही हजार मैल दूर असलेल्या वेगवान जीवनशैलीपासून दूर जाणे हा एक फ्रेश अनुभव असतो. जो मला इथे मिळतो.”(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
किंग खानने या घरात आपल्या कुटुंबासह वेळ घालवला आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’चे शूटिंग करत असतानाही शाहरुखने या घरात बराच वेळ घरात घालवला होता.
-
मागील वर्षापासून शाहरुखने पाठोपाठ- पठाण, जवान आणि डंकीसह हिट चित्रपट दिले. २०२४ मध्ये यंदा त्याने अजून त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शाहरुख खान राहिलेल्या घरात एक रात्र राहण्यासाठी भाडं किती माहित्येय का? राजेशाही व्हिलाची झलक इथे पाहा
Shahrukh Khan Beverly Hills Mansion: २०१९ मध्ये, शाहरुखने Airbnb वर भाड्याने उपलब्ध असलेल्या आलिशान मालमत्तेचे काही फोटो पोस्ट केले होते. राजेशाही घराची झलक व भाडे पाहूया..
Web Title: Shah rukh khan house where you can stay for 2 lakh rs per night srk beverly hills mansion photos modern classy villas on airbnb svs