• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. this actresses battled with cancer how did they overcome the deadly disease know the journey arg

‘या’ अभिनेत्रींनी दिला कॅन्सरशी लढा, त्यांनी कशी केली जीवघेण्या आजारावर मात? जाणून घ्या प्रवास…

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना कर्करोगाचे निदान झाले आहे. आज जाणून घेऊ या अभिनेत्रींबद्दल, ज्यांनी कर्करोगाला झुंज देत या आजारावर मात केली.

July 3, 2024 18:56 IST
Follow Us
  • bollywood-actress-cancer-patients
    1/8

    अभिनेत्री हीना खानने आपल्या सोशल मीडियाद्वारे एक घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करीत अभिनेत्रीने आपल्या आरोग्याबद्दल एक धक्कादायक पुष्टी केली. हीनाला स्तनाच्या कर्करोग झाला असल्याचे निदान झाले आहे. हा तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग आहे, असेदेखील तिने संगितले.

  • 2/8

    अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट करीत चाहत्यांनी तिला सहानुभूती देत, तिला तिच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. अनेक कलाकारांनीही हीनाला काळजी घेण्यास आणि आरोग्याला प्राधान्य देण्यास सांगितले.

  • 3/8

    याआधीही बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींना कर्करोग झाल्याचे समोर आले आहे. आज जाणून घेऊ काही अभिनेत्रींबद्दल, ज्यांनी कर्करोगाला झुंज देत या आजारावर मात केली.

  • 4/8

    २०१८ साली ताहिरा कश्यपला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. तिने हा प्रवास आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. ताहिराने कॅन्सरशी लढा देत ‘माय-एक्स ब्रेस्ट’ हे पॉडकास्टदेखील तयार केले होते. २०१९ जानेवारीपासून ताहिराने उपचाराला सुरुवात केली.

  • 5/8

    परदेस, धडकन व लज्जा या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिनेही २०२४ च्या सुरुवातीला हे सांगितले की, तिला कर्करोगाचे निदान झाले आहे.

  • 6/8

    ज्येष्ठ अभिनेत्रीला मुमताज यांना २००२ मध्ये वयाच्या ५४ व्या वर्षी स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान समोर आले होते. या आजारामुळे अभिनेत्रीला सहा केमोथेरपी आणि ३५ रेडिएशन थेरपी करून घ्याव्या लागल्या होत्या.

  • 7/8

    अभिनेत्री मनीषा कोईराला यांना २०१२ साली गर्भाशयाचा कर्करोग झाल्याची बातमी समोर आली होती. अभिनेत्रीने आपला पुढचा उपचार अमेरिकेत पूर्ण केला. नंतर त्यांनी ‘हिल्ड : हाऊ कॅन्सर गेव्ह मी अ न्यू लाइफ’ या पुस्तकात त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले.

  • 8/8

    बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने २०१८ साली मेटास्टॅटिक हाय-ग्रेड कॅन्सरच्या निदानाबद्दल खुलासा केला. अभिनेत्रीने आपला उपचार न्यूयॉर्कमध्ये पूर्ण केला. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या सकारात्मक विचारसरणीचे कौतुक केले होते.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: This actresses battled with cancer how did they overcome the deadly disease know the journey arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.