-
नाव, प्रसिद्धी, स्टारडम, पैसा आणि आदर, बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने हे सर्व मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. २०२३ मध्ये बॅक टू बॅक हिट्ससह, अभिनेता आता २०२५ मध्ये मोठ्या पडद्यावर परतणार आहे. (फोटो-SRK/Insta)
-
दरम्यान, या एका वर्षाच्या ब्रेकने त्याच्या स्टारडममध्ये कोणतीही कमी येऊ दिली नाही. यावर्षी त्याने आणखी एक यश संपादन केले आहे. (फोटो-SRK/Insta)
-
सुपरस्टार शाहरुख खानच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. होय! त्याने असे काही केले आहे की ज्याची कल्पना करणे आपल्याला कठीण आहे. शाहरुख खानने सिनेजगताला अनेक अतुलनीय चित्रपट दिले आणि त्याचे योगदान कौतुकास्पद आहे. (फोटो-SRK/Insta)
-
यासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत, पण आता त्याला मिळालेल्या सन्मानाची तुलना कोणत्याच इतर गोष्टीशी होऊ शकत नाही. (फोटो-SRK/Insta)
-
फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये असलेल्या ग्रेविन म्युझियमने शाहरुख खानच्या सन्मानार्थ खास सोन्याचे नाणे जारी केले आहे. हा असा सन्मान, पुरस्कार मिळवणारा शाहरुख खान एकमेव बॉलिवूड अभिनेता ठरला आहे. (फोटो-srk fanpage)
-
दरम्यान, २०१८ मध्ये, पॅरिसच्या प्रसिद्ध ग्रेविन म्युझियमने शाहरुखच्या सन्मानार्थ सोन्याचे नाणे जारी केले होते, ज्यामध्ये अभिनेत्याचे चित्र छापलेले आहे आणि त्याचे नाव देखील लिहिले आहे. (फोटो-srk fanpage)
-
शाहरुखच्या एका फॅन पेजने या नाण्याची झलक दाखवत हा विशेष सन्मान त्याच्या चाहत्यांसह शेअऱ केला आहे. (फोटो-SRK/Insta)
-
२००८ साली याच म्युझियममध्ये शाहरुखचा मेणाचा पुतळाही बसवण्यात आला होता. उल्लेखनीय बाब ही आहे की आत्तापर्यंत किंग खानचे १४ मेणाचे पुतळे जगाच्या विविध भागात बनवण्यात आले आहेत.
PHOTOS : आता सोन्याच्या नाण्यांवर शाहरुख खानचे चित्र, पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमकडून बॉलीवूड किंगचा मोठा सन्मान, पाहा फोटो
फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये असलेल्या ग्रेविन म्युझियमने शाहरुख खानच्या सन्मानार्थ खास सोन्याचे नाणे जारी केले आहे.
Web Title: Gravin museum paris released gold coins in his honour to shahrukh khan spl