-
अभिनेता शिव ठाकरेने आजवर अनेक रिअॅलिटी शोचा भाग राहिला आहे.
-
शिव अनेकदा सोशल मीडियावरून त्याच्या नवनवीन प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देत असतो.
-
त्याचप्रमाणे तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील घडामोडीही सोशल मीडियावर शेअर करतो.
-
शिवने रक्षाबंधननिमित्त सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर असा पेहराव केला होता.
-
तर त्याची बहीण मनिषा ठाकरे यांनी जांभळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.
-
मनिषाने शिवला राखी बांधून हा सण साजरा केला.
-
दोघेही यावेळी अतिशय आनंदी दिसत होते. दोघांची बाँडिंग पाहून चाहतेही खुश झाले.
-
दरम्यान, शिवने बहिणीला ओवाळणी देण्यासाठी शेजारी भरपूर पैसे ठेवलेले दिसले. चाहत्यांना प्रश्न पडला आहे की शिवने बहिणीला ओवाळणी म्हणून किती रुपये दिले असतील. शिवने काही वेळापूर्वीच एक मजेशीर रील शेअर केली, त्यात तो बहिणीला फक्त दहा रुपये देताना दिसला. (सर्व फोटो शिव ठाकरे)
शिव ठाकरेने बहिणीला ओवाळणी म्हणून किती रुपये दिले? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
शिव ठाकरेने बहिणीला ओवाळणी म्हणून किती रुपये दिले माहितीय का?
Web Title: How many rupees did shiv thackeray gave to his sister as a raksha bandhan gif sparking discussion on social media pvp