• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos was able to only afford meal once a day is now a top south actress read samantha struggle journey arg

Photos : एकेकाळी दिवसभरात एकदाच मिळायचं जेवण ते आज आहे टॉपची साऊथ अभिनेत्री; वाचा समांथाचा संघर्षमय प्रवास

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने अनेक संघर्षांना सामोरे जात अभिनयाक्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.

September 3, 2024 16:29 IST
Follow Us
  • Samantha-Ruth-Prabhu-Struggle-Story
    1/12

    समांथा रुथ प्रभू दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

  • 2/12

    अनेक संघर्षांना सामोरे जात समांथाने अभिनयाक्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. अनेकदा समांथाने स्वतःच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले आहे.

  • 3/12

    अभिनेत्रीच्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा तिला दिवसातून एकदाच जेवण मिळायचं. घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सामंथाने बारावीनंतर मॉडेलिंगची सुरुवात केली.

  • 4/12

    मॉडेलिंग करत तिने तिचे पुढील शिक्षण पूर्ण केले, मॉडेलिंगदरम्यान समांथाकडे जेवणासाठीही पैसे नव्हते मात्र आज ती कोट्यवधी संपत्तीची मालखीन आहे.

  • 5/12

    मॉडेलिंग करत समांथाने चित्रपटांसाठी ऑडिशन दिले. पुढे तिने ‘ये माया चेसावे’ चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेता नागा चैतन्य देखील मुख्य भूमिकेत होता.

  • 6/12

    ‘ये माया चेसावे’ या चित्रपटामुळे समांथा खूप प्रसिद्ध झाली. पुढे तिने महेश बाबू, सिद्धार्थ पवन कल्याण यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं.

  • 7/12

    अभिनयाक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर समांथाने कोट्यावधी संपत्ती कमावली. मीडिया रीपोर्टसनुसार समांथाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तिची एकूण संपत्ती १०१ कोटी रुपये आहे.

  • 8/12

    समांथा एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ५ कोटी रुपयांच मानधन घेते. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कोटींची कमाई करते.

  • 9/12

    दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर समांथा आता ओटीटीवरही पदार्पण करणार आहे.

  • 10/12

    लवकरच समांथा ‘सिटाडेल’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. समांथाने या वेब सीरिजसाठी तब्बल १० कोटींचे मानधन घेतले आहे.

  • 11/12

    ‘सिटाडेल’ ही बहुचर्चित वेब सीरिज ७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • 12/12

    (सर्व फोटो: समांथा रुथ प्रभू/इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsसमांथा रुथ प्रभूSamantha Ruth Prabhu

Web Title: Photos was able to only afford meal once a day is now a top south actress read samantha struggle journey arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.