• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. how did malaika arora s father anil arora die see in the pictures how close he was to his family even after separation spl

मलायकाच्या वडिलांचा मृत्यू कसा झाला, विभक्त झाल्यानंतर पत्नी आणि मुलींशी कसे होते बॉन्डिंग? पाहा छायाचित्रे

How did Malaika Arora s father die?: मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचा टेरेसवरून पडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतरही ते त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ होते. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

Updated: September 11, 2024 17:15 IST
Follow Us
  • Malaika Arora's father dies
    1/12

    कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतरही ते त्यांच्या कुटुंबाशी खूप जवळ होते. त्यांचा कुटुंबियांशी असलेला स्नेह तुम्ही या छायाचित्रांतून पाहू शकता. चला त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टींवर एक नजर टाकूया. (Photo- Malaika Arora/FB)

  • 2/12

    मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचा टेरेसवरून पडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्यांचा मृत्यू छतावरून पडून झाला की त्यांनी आत्महत्या केली?, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. (Photo- Malaika Arora/FB)

  • 3/12

    अनिल अरोरा हे पंजाबी हिंदू होते. पंजाबमधील फाजिल्का येथील ते मुळचे रहिवासी होते. फाजिल्का भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे. येथून अवघे दहा किलोमीटर अंतर पार केले की पाकिस्तानची सीमा सुरू होते. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 4/12

    मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इंडियन मर्चंट नेव्हीमध्ये काम केले आहे. त्यांचा विवाह मल्याळी ख्रिश्चन असलेल्या जॉयस पॉलीकार्प यांच्याशी झाला होता. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 5/12

    मलायका अरोरा ११ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला, त्यानंतर अभिनेत्री बहिण आणि आईसोबत मुंबईतील चेंबूर भागात शिफ्ट झाली. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 6/12

    अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृता अरोरा त्यांच्या आईबरोबर चेंबूरच्या बसंत टॉकीजसमोरील बोरला सोसायटीत राहायला होते. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 7/12

    मलायका अरोराने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की तिने तिच्या आईला वडिलांपासून वेगळे झाल्यानंतर खूप संघर्ष करताना पाहिले आहे. कामाबद्दलची नीतिमत्ता तिने आईकडून शिकली आहे आणि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी दुसऱ्या दिवशी सर्वकाही विसरून सकाळी लवकर कसे उठायचे हेही आईनेच शिकवले आहे. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 8/12

    मलायका अरोराचे वडील पत्नीपासून वेगळे झाले होते परंतु तरीही ते पत्नी आणि दोन्ही मुलींबरोबर अनेक कार्यक्रम आणि सण आवर्जून साजरे करायचे. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 9/12

    अनिल अरोरा आणि त्यांची पत्नी जॉयस पॉलीकार्प एकमेकांपासून वेगळे झाले होते तरी दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 10/12

    २०१६ मध्ये जेव्हा त्यांच्या पत्नीने पहिल्यांदा इंस्टाग्राम अकाउंट बनवले होते तेव्हा त्यांनी शेअर केलेला पहिला फोटो पती अनिल अरोरा यांच्याबरोबरचाच होता. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 11/12

    या फोटोंमध्ये असे दिसून येते की त्यांचे दोन्ही मुली आणि पत्नीबरोबरच्या नात्यात घटस्फोटानंतरही छान बॉन्डिंग होते. ते जवळजवळ प्रत्येक प्रसंगी एकत्र येत होते. (Photo: Joyce Arora/Insta)

  • 12/12

    हेही वाचा- Photos : वाढदिवशी शुबमन गिलने ज्या गायकाचे गाणे गायले त्याच्याच शोमध्ये पोहोचली सारा तेंडुलकर, वाईनसह केले सेलिब्रेशन, पाहा फोटो

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमलायका अरोराMalaika Arora

Web Title: How did malaika arora s father anil arora die see in the pictures how close he was to his family even after separation spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.