-
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीतील महत्वाची नायिका आहे.
-
चित्रपट, वेब सिरीज, नाटक आणि रियालिटी शो अशा सर्व ठिकाणी ती काम करते.
-
बॉलीवूडमध्येही सईच्या कामाला पसंती मिळते.
-
सईने अभिनेता आमीर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
-
दरम्यान सई ताम्हणकरचा आजघडीला मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.
-
या चाहत्यांसाठी सई तिच्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत असते.
-
अलीकडेच तिने हा फोटो शेअर केला होता.
-
तर आज पुन्हा, नऊवारी काष्टी साडी, गळ्यावर गोंदण आणि हातात कोकरू असलेले फोटो तिने फॅन्सबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सईचा गाव खेड्यातील लूक पाहायला मिळत आहे. सईचा हा लूक तिच्या येणाऱ्या वेब सिरीजमधला आहे.
-
‘मानवत मर्डर्स’ ही सईची नवीन वेब सिरीज आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिरीजमध्ये इतरही मराठी दिग्गज अभिनेते पाहायला मिळणार आहेत.
-
‘समिंद्री’ नावाचे पात्र सई या सिरीजमध्ये साकारणार आहे. (Photos- Sai tamhankar/Instagram)
Photos : नऊवारी साडी, गळ्यावर गोंदण अन् हातात कोकरू, सई ताम्हणकरच्या ‘या’ फोटोंची होतेय चर्चा
Sai Tamhankar Latest Look : सई ताम्हणकर मराठीतील आघाडीची अभनेत्री आहे. आजघडीला तिचा मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.
Web Title: Actress sai tamhankar latest pictures manvat murders webseries look see photos spl