-
श्रद्धा कपूर स्टारर ‘स्त्री भाग दोन’ हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने शाहरुख खानच्या जवानचा रेकॉर्ड मोडला आहे.
-
याशिवाय स्त्री २ सिनेमाने इतरही चित्रपटांच्या रेकॉर्डसना तोडले आहे, ज्यामध्ये रणबीर कपूरकचा अॅनिमल, सनी देओलचा गदर भाग २, आणि शाहरुख खानच्या पठाणचा समावेश आहे.
-
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘स्त्री २’ हा चित्रपट ६०० कोटी क्लबमध्ये जाऊ शकतो. चित्रपटगृहांमध्ये अजूनही हा चित्रपट सुरूच आहे. कमाई अशीच सुरू राहिली तर हा चित्रपट जवान चित्रपटाला कामईच्या बाबतीत लवकरच मागे टाकणार आहे, असे मत त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये व्यक्त केले आहे.
-
चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ५८६ कोटी रुपये कमावले आहेत. हा चित्रपट पाचव्या आठवड्यात पोहोचला आहे. या आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी ३.६० कोटी, शनिवारी ५.५५ कोटी आणि रविवारी ६.८५ कोटी रुपये गल्ला जमवण्यात स्त्री २ ला यश आले आहे.
-
शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर जवान हा चित्रपट आतापर्यंतचा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. ६४०.२५ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. गेल्या वर्षी १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
तर मागील वर्षी १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूरच्या अॅनिमलने ५५३.८७ कोटी रुपये कमावले होते.
-
शाहरुख खानचा २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झालेला पठाण हा यशराजच्या बनरखाली बनलेला चित्रपट होता. या सिनेमाने ५४३.०५ कोटी रुपये कमावले होते.
-
बॉलीवूडच्या सुपरहिट गदर चित्रपटाच्या सिक्वल ‘गदर २’ ने तुफान कमाई करत ५२५.४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
-
हा चित्रपट गेल्यावर्षी ११ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.
‘स्त्री २’ ने जबरदस्त कमाई करत शाहरुखच्या ‘जवान’ला टाकले मागे, ‘या’ पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जमवला सर्वाधिक गल्ला!
stree 2 box office collection : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत स्त्री २ या चित्रपटाने कमाईचे नवे आकडे पार केले आहेत.
Web Title: Stree 2 movie box office collection emerge a new record top 5 earners movies spl