-
टीव्ही जगतातील बहुचर्चित आणि लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चा १८ वा सीझन पुन्हा एकदा नव्या थीम आणि नव्या स्टाइलसह प्रेक्षकांसमोर येत आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही शोचे चाहते बिग बॉसच्या नव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आता शोच्या सेटचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
-
बिग बॉस १८ ची थीम ‘समय का तांडव’ वर आधारित आहे. यावेळी घराची रचना गुहेसारख्या करण्यात आली आहे. तरी याला एका भव्य आणि आलिशान गुहेसारखे हॉटेलचे स्वरूप देण्यात आले आहे.
-
बेडरुममध्ये सिंगल, डबल आणि ट्रिपल बेड अशा वेगवेगळ्या बेड आहेत. बेडरूमच्या भिंतींवर मत्स्यालयसारख्या आकर्षक डिझाईन्स देखील जोडल्या गेल्या आहेत, ज्यामुळे ते आणखी खास बनले आहे.
-
यावेळी बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच घराच्या मध्यभागी जेल बनवण्यात आले आहे, ज्यामुळे स्पर्धकांना स्पष्टपणे पाहता येईल. याशिवाय घरामध्ये भूतकाळ आणि भविष्यकाळाची बैठक दाखवणारा ‘युद्ध मंच’ही तयार करण्यात आला आहे. हा भव्य सेट प्रसिद्ध कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि प्रॉडक्शन डिझायनर वनिता कुमार यांनी तयार केला आहे.

ओमंग कुमार यांच्यानुसार त्याने यंदा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ या थीमला फॉलो केले आहे.
-
ओमंग आणि वनिता यांनी बिग बॉसचे हे घर केवळ ४५ दिवसांत पूर्ण केले आहे, घराच्या या बांधकामात सुमारे २०० कारागिरांनी योगदान दिले आहे. ‘समय का तांडव’ या थीमसह डिझाइन केलेले हे घर खुप भव्य आहे. (फोटो: जिओ सिनेमा)
Shani Gochar 2025: शनीच्या साडेसाती आणि ढैय्येपासून ५ राशींना मिळणार सुटका, करिअरमध्ये घेणार मोठी झेप, वर्षभर होईल पैशांचा पाऊस