-
अलीकडेच, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडेने लॅक्मे फॅशन वीकमध्ये ‘हाऊस ऑफ लॅक्मे’ च्या ग्रँड फिनालेमध्ये स्टॉपर म्हणून सर्वांचे लक्ष वेधले. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
यादरम्यान तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बलने डिझाइन केलेल्या सुंदर काळ्या लेहेंगामध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर वॉक केला. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
या लेहेंग्याच्या डिझाईनने भारतीय फॅशनला नवा आयाम दिला आणि अनन्याच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
दरम्यान, फॅशन डिझायनर रोहित बल हे बऱ्याच काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांशी झुंजत होते. तब्बल १० महिन्यांनी या आजाराशी झुंज दिल्यानंतर त्यांनी रॅम्पवर पुनरागमन केले आहे. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
अनन्या पांडेने या खास डिझाइन केलेल्या लेहेंग्यात रॅम्प वॉक केला. रोहित बल यांनी डिझाइन केलेल्या या ड्रेसमध्ये लाल आणि हिरवा फुलांचे तपशील आणि प्राणी पॅटर्न (Red and Green Floral Detailing and Animal Pattern) डिझाइन आहे. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
तिचा हा काळ्या रंगाचा नक्षीदार लेहेंगा खूप श्रीमंत आणि रॉयल लुक देत होता. त्याच वेळी, लेहेंग्यासोबत जुळणाऱ्या केपने हा आउटफिट आणखी स्टायलिश बनवला आहे. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
अनन्या पांडेने तिचा लूक खूप सुंदर कॅरी केला आहे. तिच्या वेशभूषेइतकाच अभिनेत्रीचा मेकअपही आकर्षक आहे. तिने सटल आणि न्यूड टोनचा मेकअप लूक निवडला आहे. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
तिने बोल्ड लिपस्टिक आणि डिफाइन्ड आयलाइनरसह ग्लॅमरस लुक केला आहे. यासह तिने आपले केस स्लीक आणि क्लासिक बनमध्ये स्टाईल केले आहेत. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
ड्रेससोबतच अनन्याने काही साध्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे. तिने एका हातात वॉच स्टाइल सोनेरी रंगाचे ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात अंगठी घातली आहे. (Photo Source: @ananyapanday/instagram)
-
तिने तिच्या कानात सोन्याचे झुमके घातले आहेत, जे तिच्या संपूर्ण आऊटफिट आणि मेकअपशी पूर्णपणे जुळतात. एकंदरीत, अनन्या पांडेचा हा लूक रॉयल आणि ग्लॅमरस दोन्ही प्रकारचा आहे, जो ट्रेडिशनल आणि मॉडर्न स्टाईल दोन्हींचा परिपूर्ण समतोल राखत आहे. (Photo Source: @ananyapanday/instagram)
हेही वाचा- ‘हे’ मल्याळम चित्रपट OTT वर धुमाकूळ घालत आहेत, जबरदस्त ॲक्शन थ्रिलरने भरलेल्या ‘या’ स…
Photos : लॅक्मे फॅशन वीकमधील अनन्या पांडेच्या आउटफिटने वेधले लक्ष, रॉयल लूकमध्ये केला रॅम्पवॉक
Ananya Panday : अनन्या पांडेचा हा लूक खूपच स्टनिंग आणि क्लासी आहे. या फोटोशूटमध्ये तिने सुंदर नक्षी असलेला काळा लेहेंगा घातला आहे, ज्यात लाल आणि हिरव्या रंगाच्या फुलांचे डिझाईन आहे.
Web Title: Ananya pandey slays lakme fashion week in a royal look walks the ramp in rohit bal designer dress spl