-
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी बॉलीवूडमधील खास रोमान्सची आहे. हेमा यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या कौटुंबिक अल्बममधील फोटोंवर एक नजर टाकूयात. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
धर्मेंद्रसोबत लग्न करण्यापूर्वी हेमा मालिनी यांना इतर अनेक कलाकारांनी प्रपोज केले होते. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
जितेंद्र, संजीव कुमार आणि दिग्गज राज कुमार या काही स्टार्सना हेमा मालिनी यांनी नकार दिला होता. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
हेमा आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट १९७० मध्ये आलेल्या तू हसीन मैं जवान या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
हेमा यांनी एकदा शेअर केले आहे की त्यांना धर्मेंद्र सारख्या कोणाशी तरी लग्न करायचे होते हे धर्मेंद्र यांना पाहून लगेच कळले होते. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
हेमाच्या घरच्यांना जेव्हा त्यांचे धर्मेंद्र यांच्यावर प्रेम असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी विरोध केला. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
हेमा यांनी सिमी गरेवाल शोमध्ये सांगितले होते, “मी धर्मेंद्रला कॉल केला आणि मी म्हणाले, ‘तुला आता माझ्याशी लग्न करावे लागेल.’ तो म्हणाला, ‘हो, मी तुझ्याशी लग्न करेन.’ असे आमचे लग्न झाले. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
हेमा आणि धर्मेंद्र यांना ईशा देओल आणि आहाना देओल या दोन मुली आहेत. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
ईशा देओल नियमितपणे तिच्या लाडक्या आईसोबतचे फोटो शेअर करत असते. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र तब्बल ४४ वर्षांपासून एकत्र आहेत. (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
-
हेमा मालिनी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! (फोटो: एक्सप्रेस संग्रह)
Hema Malini turns 76: ‘ड्रीम गर्ल’ने धर्मेंद्रबरोबर लग्न करण्यासाठी ‘या’ दिग्गज कलाकारांना दिला होता नकार
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची प्रेमकहाणी बॉलीवूडमधील खास रोमान्सची आहे. हेमा यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या कौटुंबिक अल्बममधील फोटोंवर एक नजर टाकूयात.
Web Title: Hema malini turns 76 dream girl rejected many suitors to marry dharmendra spl