-
एमएस धोनी
क्रिकेट सुपरस्टार महेंद्रसिंग धोनीवर आधारित ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटानेही धुमाकूळ घातला. या चित्रपटासाठी धोनीने ४५ कोटी रुपये घेतले होते. (Still From Film) -
संजय दत्त
‘संजू’ चित्रपटात संजय दत्तची जीवनकथा दाखवण्यात आली होती, ज्यामध्ये रणबीर कपूरने त्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी संजयने ९ कोटी रुपये फी आणि नफ्यात वाटा घेतला. (Still From Film) -
कपिल देव
कपिल देव यांच्या बायोपिक ‘८३’मध्ये रणवीर सिंगने त्यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी कपिल देव यांनी ५ कोटी रुपये घेतले होते. (Still From Film) -
महावीर सिंग फोगट
‘दंगल’ चित्रपटात आमिर खानने महावीर सिंग फोगट यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी महावीर यांनी फक्त एक कोटी रुपये घेतले होते. (Still From Film) -
सायना नेहवाल
परिणीती चोप्राने बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिक ‘सायना’मध्ये काम केले होते. या चित्रपटासाठी सायनाने ५० लाख रुपये फी घेतली होती. (Still From Film) -
मेरी कोम
प्रियांका चोप्राने ‘मेरी कॉम’ या बायोपिकमध्ये बॉक्सिंगच्या जगात आपले नाव कमावणाऱ्या मेरी कोमची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी मेरीने २५ लाख रुपये फी घेतली होती. (Still From Film) -
लक्ष्मी अग्रवाल
‘छपाक’ चित्रपटात दीपिका पदुकोणने ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारली होती. यासाठी लक्ष्मीने केवळ १३ लाख रुपये फी घेतली. (Still From Film) -
मिल्खा सिंग
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंग यांची भूमिका साकारली होती. या बायोपिकसाठी मिल्खा सिंग यांनी फक्त एक रुपया घेतला होता. (Still From Film) -
मोहम्मद अझरुद्दीन
इमरान हाश्मीने ‘अजहर’ या बायोपिकमध्ये क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनची भूमिका साकारली होती. अझरुद्दीनने या चित्रपटासाठी कोणतेही शुल्क घेतले नाही. (Still From Film) -
आयपीएस मनोजकुमार शर्मा
विक्रांत मेसीने आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या बायोपिक ‘१२ th फेल’मध्ये काम केले होते. या चित्रपटासाठी मनोजने एकही पैसा घेतला नाही. (Still From Film)
हेही पाहा – Do Patti चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार क्रिती सेनॉन, आतापर्यंत ‘या’ बॉलीवूड अभिनेत्…
महेंद्रसिंग धोनी, संजय दत्त ते मेरी कोमपर्यंत, स्वतःवरील बायोपिकसाठी ‘या’ सेलिब्रिटींनी किती फी आकारली?
Biopic Fees : बॉलिवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. हे चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नसून अनेक सेलिब्रिटींच्या जीवन कथा प्रेक्षकांसमोर आणण्याचे माध्यमही आहेत. या सेलिब्रिटींनी त्यांच्या बायोपिकसाठी किती फी आकारली ते जाणून घेऊया.
Web Title: Ms dhoni to sanjay dutt how much did real life heroes charge for their biopic spl