• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actors abhishek bachchan affairs pps

Photos: फक्त निम्रत कौरचं नाही तर अभिषेक बच्चनबरोबर ‘या’ अभिनेत्रींची जोडली होती नावं

अभिषेक बच्चनचं या प्रसिद्ध अभिनेत्रींबरोबर ठरलं होतं लग्न, पण ऐनवेळेला….

Updated: October 30, 2024 18:08 IST
Follow Us
  • Bollywood Actors Abhishek Bachchan Affairs
    1/15

    बॉलीवूडच्या लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन.

  • 2/15

    सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. एवढंच नाहीतर घटस्फोट झाल्याचं म्हटलं जात आहे.

  • 3/15

    पण, घटस्फोटांच्या चर्चांवर अजूनपर्यंत अभिषेक आणि ऐश्वर्याने मौन पाळलं आहे.

  • 4/15

    अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याचं कारण अभिनेत्री निम्रत कौर असल्याचं म्हटलं जात आहे.

  • 5/15

    सध्या अभिषेकचं नाव निम्रत कौरबरोबर जोडलं जात आहे. पण याआधी अभिषेकचं कोण-कोणत्या अभिनेत्रींबरोबर नाव जोडलं होतं? जाणून घ्या…

  • 6/15

    अभिषेक बच्चनचं सर्वात आधी अफेअर मॉडेल, अभिनेत्री दीपानिता शर्माबरोबर होतं. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने दीपानिता आणि अभिषेकची भेट करून दिली होती.

  • 7/15

    अभिषेक आणि दीपानिता एकमेकांना १० महिने डेट करत होते. पण, अभिषेकला त्यांचं नातं लाइमलाइटमध्ये यावं असं वाटतं नव्हतं. म्हणून दोघं वेगळे झाले.

  • 8/15

    दीपानितानंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूरचं अफेअर खूप चर्चेत होतं. बहीण श्वेता बच्चनच्या लग्नाच्यावेळी अभिषेक आणि करिश्माची ओळख झाली होती.

  • 9/15

    अभिषेक आणि करिश्मा एकमेकांना जवळपास पाच वर्ष डेट करत होते. त्यानंतर २००२मध्ये एका कार्यक्रमात जया बच्चन यांनी अभिषेक आणि करिश्माच्या लग्नाची घोषणा केली होती.

  • 10/15

    जया बच्चन यांच्या घोषणेनंतर अभिषेक आणि करिश्माच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. पण काही दिवसांनंतर दोघांचं लग्न मोडल्याचं वृत्त आलं.

  • 11/15

    करिश्मानंतर अभिषेकचं नावं राणी मुखर्जीबरोबर जोडलं गेलं. दोघांचं नातं इतकं चांगलं होतं की, राणी मुखर्जी बच्चन कुटुंबाची सून होणार या चर्चांना वाव आला होता. पण, वेगळंच काहीतरी घडलं.

  • 12/15

    अभिषेक बच्चनचं लग्न ऐश्वर्याबरोबर झालं. दोघांच्या लग्नाबाबत ऐकताच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला होता.

  • 13/15

    ‘गुरु’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिषेकने ऐश्वर्या रायला प्रपोज केलं होतं आणि एप्रिल २००७मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.

  • 14/15

    लग्नाच्या चार वर्षांनंतर अभिषेक आणि ऐश्वर्या आई-बाबा झाले. त्यांना आराध्या झाली.

  • 15/15

    पण, आता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून रंगल्या आहेत. ( सर्व फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस, जनसत्ता )

TOPICS
अभिषेक बच्चनAbhishek Bachchanऐश्वर्या राय बच्चनAishwarya BachchanबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Bollywood actors abhishek bachchan affairs pps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.