-
मीरा राजपूत
बरेच बॉलीवूड सेलिब्रिटी प्रेमविवाह करताना दिसतात, पण एक अभिनेता असाही आहे ज्याने त्याचे लग्न अरेंज पद्दतीने केले. त्याने इंडस्ट्रीबाहेरील मुलीशी लग्न तर केलेच पण दोघांमधील वयाचे अंतरही खूप मोठे आहे. खरंतर दोघांच्या वयात तब्बल १४ वर्षाचं अंतर आहे, पण वयात एवढं मोठं अंतर असलं तरी त्यांच्या प्रेमात कधीच कोणतही अंतर नाही. -
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत तो अभिनेता आहे शाहिद कपूर. दरम्यान, शाहिद कपूरचे नाव यापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण त्याच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी पाहून लग्न ठरवले होते. शाहिद ३४ वर्षांचा असताना त्याने २० वर्षांच्या मीराशी लग्न केले. -
शाहिद-मीराचे अरेंज्ड मॅरेज
दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. इतकेच नाही तर मीराने मुलीला जन्म दिला तेव्हा ती केवळ २२ वर्षांची होती. शाहिद आणि मीरा यांना दोन मुलं असली तरी या अलीकडच्या काळात मीराने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला. -
मीराचा ब्रँड
मीराने तिचा स्किनकेअर ब्रँड लॉन्च केला. आणि आता ती हाच व्यवसाय करत आहे. एनरिचेस्टच्या अहवालानुसार मीराची सध्याची एकूण संपत्ती ७-८ कोटी रुपये आहे. ही फक्त तिच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती आहे. मीराने हा ब्रँड २०२३ मध्ये लॉन्च केला आहे. -
मीरा जाहिरातीही करते
याशिवाय मीरा अनेक प्रकारच्या जाहिरातीही करते आणि त्यातूनही कमाई करते, त्यामुळे एकूण पाहायचे झाल्यास ती करोडोंची कमाई करत असावी, असे बोलले जाते. -
मीरा-शाहिदचे अपार्टमेंट
तसे, मीरा आणि शाहिदकडे अनेक आलिशान अपार्टमेंट आहेत. जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार, दोघेही राहत असलेल्या घराची किंमत जवळपास ५६ कोटी आहे. -
शाहिद-मीराची आलिशान कार
इंडियन एक्सप्रेस आणि कारदेखोच्या वृत्तानुसार, मीरा आणि शाहिदकडे लक्झरी कारही आहेत. त्यांच्याकडे मर्सिडीज मेबॅच जीएलएस ६०० आहे जीची किंमत ३.५ कोटी रुपये आहे, मर्सिडीज बेंझ मेबॅक स्क्लास जी २.६९ कोटी रुपयांची आहे आणि एक पोर्श कारही आहे जी १.७० कोटी रूपयांची आहे. -
मीरा-शाहिद कॉफी विथ करण
मीरा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये शाहिद कपूरसोबत दिसली आहे. मीराचा आत्मविश्वास पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. तिने करणच्या प्रश्नांची चोख उत्तरे दिली होती. (सर्व फोटो साभार- मीरा राजपूत इन्स्टाग्राम)
३४ वर्षांच्या बॉलीवूड अभिनेत्याशी २०व्या वर्षी झालेलं लग्न; आज आहे यशस्वी उद्योजिका, स्वतः कमावते कोट्यवधी
आज आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने इंडस्ट्री सोडून कुटुंबाने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. असं असलं तरीही दोघांमधील बंध प्रेम-विवाह जोडप्यासारखेच आहेत.
Web Title: Shahid kapoor and wife mira rajput age diffrence net worth and business information spl