-
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत जे दारूच्या व्यवसायातून मोठी कमाई करतात. संजय दत्त व्यतिरिक्त शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान देखील दारूच्या व्यवसायातून मोठी कमाई करतो. (फोटो: पेक्सेल्स)
-
पण फार कमी लोकांना माहित असेल की ८० आणि ९० च्या दशकातील एक प्रसिद्ध चित्रपट खलनायक आहे जो या स्टार्सपेक्षा आधीच दारूच्या व्यवसायातून मोठी कमाई करत होता. या स्टारची स्वतःची कंपनी आहे जी ११ प्रकारची बिअर बनवते. (फोटो: पेक्सेल्स)
-
खरं तर, आपण प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्झोंगपाबद्दल बोलत आहोत ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून प्रेक्षकांना घाबरवले आहे. डॅनी यांची सिक्कीममध्ये युक्सॉम बेव्हरेजेस नावाची दारू कंपनी आहे. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
डॅनी डेन्झोंगपाचे युक्सम बेव्हरेज दरवर्षी तीन दशलक्ष बिअर विकते. हा भारतातील तिसरा सर्वात मोठा बिअर ब्रँड असल्याचे म्हटले जाते. या कंपनीला डॅनी डेन्झोंगपा आणि त्याचे कुटुंबीय चालवतात. (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
-
ओडिशासह आसाममध्ये राइनो ब्रुअरी नावाने ही कंपनी आहे. डॅनी डेन्झोंगपा यांचा हा बिअर ब्रँड भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. (फोटो: पेक्सेल्स)
-
त्यांनी युक्सम व ब्रुअरीज प्रमाणे, तब्बल ११ प्रकारचे बिअर ब्रँड तयार केले आहेत. जाणून घेऊया त्यांची नावे: (फोटो: पेक्सेल्स)
-
Dansberg Diaet, Denzong 9000, Jhoom, Himalayan Blue, India Special, Dansberg 16000, Heman 9000, YETI, Dansberg Red. (फोटो: पेक्सेल्स)
-
याशिवाय ही कंपनी हिट अँड इंडिया स्पेशल बीअरचे उत्पादनही करते. या कंपनीअंतर्गत बनवलेल्या बिअरची ही सर्व नावे आहेत. (फोटो: पेक्सेल्स)
-
ओडिशात या बिअरची सुरुवातीची किंमत १०५ रुपये आहे. अनेक बिअरची किंमत ११५ रुपये आणि त्याहूनही अधिक आहे. (फोटो: पेक्सेल्स) हेही पाहा- Photos : ट्रेन आहे की 5 स्टार हॉटेल? पहिली ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन आतून आहे खूपच आलिशान, पाहा फोटो
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे तब्बल ११ बिअर ब्रँडचा मालक, ‘एवढ्या’ किमतीत विकल्या जातात बिअर्स
Danny Denzongpa Alcohol Name and Price: बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक डॅनी डेन्झोंगपा देखील दारूच्या व्यवसायातून भरपूर कमाई करतात. त्यांची कंपनी ११ प्रकारच्या बिअरचे उत्पादन करते जी ईशान्य भारतातमध्ये खूप प्रसिद्ध आहे.
Web Title: How much does this famous bollywood villain s beer cost it is india s third largest brand spl