-
अनेक कलाकारांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेत आहोत जो एकेकाळी मित्रांकडून पैसे मागायचा आणि आजघडीला मात्र सुपरस्टार बनला आहे.
-
या अभिनेत्याने छोट्या शहरातून मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन केवळ नावच कमावले नाही तर आज तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
-
आपण कार्तिक आर्यनबद्दल बोलत आहोत. कार्तिकने प्यार का पंचनामा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या गर्लफ्रेंडवाला मोनोलॉग चांगलाच व्हायरल झाला होता.
-
दरम्यान, कार्तिकला प्यार का पंचनामा २ या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर त्याचा सोनू के टीटू की स्वीटी हा चित्रपट आला ज्याने बॉक्स ऑफिसवरही खळबळ उडवून दिली.
-
‘भूल भुलैया २’ चित्रपटानंतर कार्तिक बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. कार्तिकने अनेक अनोखे चित्रपटही केले आहेत. अलीकडेच कार्तिकने सांगितले की, त्याने एकदा मुंबईत शिक्षणासाठी कर्ज घेतले होते. तसेच तो अडचणींच्या दिवसांत मित्रांनाही पैशाची मागणी करत असे.
-
अशा संघर्षमय दिवसांत कार्तिकने काहीतरी करण्याचा विचार केला आणि ३ वर्षांच्या रिजेक्शन्सनंतर अखेर कार्तिकला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
-
आता कार्तिक त्याच्या आगामी ‘तू मेरी में तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटासाठी ५० कोटी रुपये मानधन घेत आहे.
-
दरम्यान, आपण कार्तिकच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर त्यानं मोठी झेप घेतली आहे. २०२२ मध्ये कार्तिकची एकूण संपत्ती ४६ कोटी रुपये होती. पण अनेक ब्रँड एंडोर्समेंट्स आणि वाढत्या मानधनानंतर, पिंकविलानुसार अभिनेत्याची एकूण संपत्ती आता २५० कोटी रुपये झाली आहे.
-
कार्तिककडे BMW, Mini Cooper आणि Lamborghini सारख्या अनेक लक्झरी कार्सही आहेत. (Photos Source: Kartik Aaryan Instagram)
हेही पाहा- Photos : श्रद्धा कपूरपासून ते काजोल, शहनाज गिलपर्यंत बॉलीवूड स्टार्सनी नवीन वर्ष कसे साजरे केले? पाहा फोटो
५० कोटी मानधन घेणारा हा अभिनेता मित्रांना मागायचा उसने पैसे; ३ वर्षांच्या रिजेक्शननंतर मिळाला पहिला चित्रपट, आजघडीला आहे ‘इतकी’ संपत्ती
अनेक कलाकारांना त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागतो. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेत आहोत जो एकेकाळी मित्रांकडून पैसे मागायचा आणि आजघडीला मात्र सुपरस्टार बनला आहे.
Web Title: Kartik aaryan networth and his struggle time details spl