• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress kshitee jog on what she learn from failure of sunny movie nsp

‘सनी’ चित्रपटाच्या अपयशातून काय शिकायला मिळालं? क्षिती जोग म्हणाली…

Kshitee Jog: लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोग काय म्हणाली? घ्या जाणून…

Updated: January 31, 2025 22:30 IST
Follow Us
  • Kshitee Jog
    1/9

    क्षिती जोग(Kshitee Jog)ने नुकतीच अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिला ‘सनी’ चित्रपट अपयशी ठरल्यानंतर निर्माती म्हणून त्यातून काय शिकायला मिळालं? असा प्रश्न विचारण्यात आला.

  • 2/9

    यावर बोलताना क्षितीने म्हटले, “खूप शिकायला मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं हे शिकायला मिळालं की, कोणत्याच गोष्टीला गृहीत धरू नका.”

  • 3/9

    “‘झिम्मा’नंतर आम्ही ‘सनी’ हा चित्रपट केला. तर त्यामुळे वाटलं की लोकांना हे आवडणार आहे, हे होणारच आहे.”

  • 4/9

    “त्या चित्रपटावर मला अभिमान आहे. तो चित्रपट जसा झाला आहे, त्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे. त्याचा जो कंटेंट आहे, लोकांनी जी कामं केली आहेत; ‘झिम्मा’नंतरचं त्या चित्रपटातील मला हेमंतचं खरंच काम आवडलं होतं.”

  • 5/9

    “पण, हे शिकायला मिळालं की गोष्टी गृहीत धरू नये. एक ‘झिम्मा’चालला म्हणजे पुढचं सगळं चालेलंच असं नाही.”

  • 6/9

    “माझ्या बाजूने अभ्यास कमी पडला. त्याची रिलीज डेट, कदाचित प्रमोशन किंवा होणारी पब्लिसिटी हे सगळं माझ्या बाजूने कमी पडलं असं मला दरवेळी वाटतं.”

  • 7/9

    “त्यानंतर आम्ही या सगळ्याचा अभ्यास निक्षून करू लागलो. मला आता असं वाटतं की, एक प्रकारे बरं झालं. तो चित्रपट चालला नाही, लोकांना बघायला मिळालं नाही, याचं वाईट वाटतं. पण, वेळीच शिकवण आली”, असे म्हणत क्षितीने ‘सनी’ अपयशी ठरला असला तरी त्यातून शिकायला मिळाले, असे म्हटले आहे.

  • 8/9

    हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची निर्माती क्षिती जोग आहे. याबरोबरच ती अमेय वाघ व सिद्धार्थ चांदेकर यांच्याबरोबर मुख्य भूमिकेतही दिसली आहे.

  • 9/9

    भावंडांवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य: क्षिती जोग इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress kshitee jog on what she learn from failure of sunny movie nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.