Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta mali reveals monthly expenses says because of loan installments it in lakhs of rupees also shares skin care routine nsp

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? म्हणाली…

Prajakta Mali: “मी रोज सकाळी एक चमचा…”, प्राजक्ता माळी त्वचेची कशी काळजी घेते? घ्या जाणून…

Updated: February 28, 2025 09:17 IST
Follow Us
  • Prajakta Mali
    1/12

    अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) अनेकदा तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील पोस्ट तसेच विविध मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते.

  • 2/12

    अभिनेत्रीने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीला तिचा महिन्याचा एकूण खर्च किती असतो, असा प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना प्राजक्ता माळीने सुरुवातीला हसत म्हटले, “मला खूप वर्षांपासून गणिताला बसायचं आहे की माझा खर्च किती होतो, पण ते होतच नाही.”

  • 3/12

    पुढे अभिनेत्रीने म्हटले, “पण फार नाहीये. मी ती व्यक्ती आहे, जी कमी संसाधनामध्ये आयुष्य जगते. कमी संसाधने वापरते, म्हणजे मी कपडे लवकर फेकून देत नाही. नवीन काही भांडी वगैरे आणण्याची मला काही आवड नाही.”

  • 4/12

    “आधीचं मटेरिअल संपल्याशिवाय मी मेकअप वैगेरे काही आणत नाही. असं सगळं असल्यामुळे कमी खर्च असावा. पण, तरी आता कर्जाचे हप्ते असल्यामुळे लाखो रुपये असेल.”

  • 5/12

    पुढे तिला तिच्या स्कीन केअर रूटीनविषयी विचारले. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले की, मी उत्तम जेवते. मी कुठलेही सोडा असलेले पेय पित नाही.

  • 6/12

    मी खूप कमी मैद्याचे पदार्थ खाते. सोडा, मैदा, साखर बंद करा किंवा कमी करा. जितकं तुम्ही खाता तितकी तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे.

  • 7/12

    मी असं गणित ठेवते की आज सुट्टी आहे आणि मी दोन चित्रपट पाहणार आहे, तर मी जागेवरून हलणार नाहीये, तर मी कमी खाल्लं पाहिजे. आज मी शूट करतेय तर मी व्यवस्थित भाजी, पोळी, वरण, ताक असा सगळा आहार घेते. कारण मला काम करायचं आहे.

  • 8/12

    मी रोज सकाळी एक चमचा तूप खाते आणि पाणी पिते. चौरस आहाराला मी महत्त्व देते.

  • 9/12

    अत्यंत आनंदाने मी सांगू इच्छिते की रात्री आठनंतर मी जेवत नाही. जेवण, जीवनपद्धती, पाणी पिण्याच्या तऱ्हा याचा सगळ्याचा जास्त तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो.

  • 10/12

    योग व प्राणायम हे महत्त्वाचे आहे. याबरोबरच रोज उठल्यानंतर मी त्वचेसाठी टोनर, मॉइश्चराइझर, सनस्क्रीन वापरते. मेकअप करणार असेल तर आधी प्रायमर आणि मग मेकअप करते.

  • 11/12

    रात्री झोपताना टोनर, त्यानंतर नाइट क्रीम किंवा तेल लावते, असे म्हणत ती तिच्या निरोगी त्वचेसाठी काय करते हे तिने सांगितले आहे.

  • 12/12

    प्राजक्ता माळी लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

TOPICS
प्राजक्ता माळीPrajakta MaliमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress prajakta mali reveals monthly expenses says because of loan installments it in lakhs of rupees also shares skin care routine nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.