• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. indian sci fi movies top 10 hindi south sci fi films that compete with the best of hollywood see list kvg

Indian Sci-Fi Movies: Sci-Fi प्रकारात भारतीय चित्रपटही देतात हॉलिवूडला टक्कर; वीकेंडला ‘या’ १० चित्रपटाचा आनंद घ्या

Indian Sci-Fi Movies: भारतीय चित्रपटांनी साय-फाय शैलीमध्येही आपला ठसा उमटवला आहे. भारतातही असे अनेक चित्रपट बनले आहेत ज्यांनी हॉलिवूडलाही टक्कर दिली.

March 22, 2025 20:41 IST
Follow Us
  • science fiction
    1/11

    भारतीय चित्रपट सामान्यतः नाट्य, मारधाड आणि रोमान्ससाठी ओळखले जातात, परंतु भारतीय चित्रपटांनी वेळोवेळी Sci-Fi प्रकारातही आपला ठसा उमटवला आहे. जरी हॉलिवूडमध्ये या शैलीचे वर्चस्व असले तरी भारतीय चित्रपटांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचा वापर करून टाइम ट्रॅव्हल, रोबोटिक्स आणि एलियन्स सारख्या संकल्पना सादर केल्या आहेत. विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा उत्तम मेळ घालणाऱ्या अशा १० भारतीय Sci-Fi चित्रपटांबद्दल जाणून घेऊया. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 2/11

    मि. एक्स इन बॉम्बे (१९६४)
    ‘मि. एक्स इन बॉम्बे’ हा भारतातील सर्वात जुन्या Sci-Fi चित्रपटापैकी एक आहे. ही कथा एका शास्त्रज्ञाच्या अयशस्वी प्रयोगाने सुरू होते, ज्यामुळे एक माणूस अदृश्य होतो. यानंतर, चित्रपटात रोमान्स आणि ॲक्शनचा एक अनोखा खेळ दिसून येतो. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 3/11

    मिस्टर इंडिया (१९८७)
    जर आपण भारतीय Sci-Fi चित्रपटांबद्दल बोललो तर मिस्टर इंडिया चित्रपटाला विसरता येणार नाही. अदृश्य करू शकणारं घड्याळ, मोगॅम्बोची खतरनाक योजना आणि अनाथ मुलांचे सुंदर जग.. हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या हृदयात घर करून आहे.
    (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 4/11

    कोई… मिल गया (२००३)
    हा भारतातील पहिला एलियनवर आधारित चित्रपट होता, ज्यामध्ये “जादू” नावाचा एलियन जगभरात प्रसिद्ध झाला. या चित्रपटातील पात्र रोहित आणि एलियनमधील मैत्री दाखवण्यात आली आहे. ज्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत विज्ञानकथेची एक नवीन लाट आली. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 5/11

    एन्थिरन (रोबोट) (२०१०)
    रजनीकांत आणि ऐश्वर्या राय अभिनित हा चित्रपट भारतातील सर्वात मोठ्या Sci-Fi चित्रपटांपैकी एक आहे. त्यात एका शास्त्रज्ञाने तयार केलेल्या चिट्टी नावाच्या रोबोटची कथा सांगितली आहे. जो मानवी भावना अनुभवू लागतो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 6/11

    इंद्रु नेत्रु नालाई (Indru Netru Naalai) (२०१५)
    तमिळ चित्रपटसृष्टीतील या Sci-Fi चित्रपटात टाइम ट्रॅव्हलची कथा अतिशय मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आली आहे. जेव्हा दोन सामान्य माणसे स्वतःच्या फायद्यासाठी वेळेचा वापर करण्यासाठी टाईम मशीनचा वापर करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात भयंकर उलथापालथ होते. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 7/11

    २४ (२०१६)
    तमिळ चित्रपट २४ हादेखील टाइम ट्रॅव्हलचा विलक्षण खेळ दाखविणारा चित्रपट आहे. ज्यामध्ये एक शास्त्रज्ञ टाइम ट्रॅव्हल करणारे घड्याळ तयार करतो. त्याचा जुळा भाऊ घड्याळाचा ताबा घेऊ इच्छितो, ज्यामुळे संपूर्ण कथेला एक महत्त्वाचे नाट्यमय वळण प्राप्त होते.
    (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 8/11

    अँड्रॉइड कुंजप्पन ५.२५ (२०१९)
    मल्याळम चित्रपट अँड्रॉइड कुंजप्पन ५.२५ मध्ये तंत्रज्ञान आणि मानवी भावनांचे एक अनोखे मिश्रण दाखवले आहे. जेव्हा एका वृद्ध व्यक्तीला त्याची काळजी घेण्यासाठी रोबोट दिला जातो, मात्र वृद्ध रोबोट स्वीकारण्यास नकार देतो. पण पुढे हळूहळू त्यांच्यात एक अनोखे नाते निर्माण होते. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 9/11

    कार्गो (२०१९)
    हा एक अतिशय अनोखा Sci-Fi चित्रपट आहे, जो अंतराळयानावरील आत्म्यांचा पुनर्जन्म आणि संक्रमण दाखवतो. ही कथा केवळ विज्ञानालाच स्पर्श करत नाही तर मानवी भावनांनाही खोलवर स्पर्श करते. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 10/11

    अद्भूतम (२०२१)
    तेलुगू चित्रपट ‘अद्भूतम’ची कथा दोन लोकांभोवती फिरते. जे आत्महत्या करण्याच्या तयारीत असतात. पण त्यांचे मोबाईल नंबर सारखेच असतात. ते एकमेकांच्या संपर्कात येतात आणि एक मोठे रहस्य उलगडते, जे संपूर्ण चित्रपटाला एक मनोरंजक वळण देते. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

  • 11/11

    मानाडू (Maanaadu) (२०२१)
    हा तमिळ साय-फाय चित्रपट असून यात राजकीय अॅक्शन थ्रिलर आहे. जो टाइम लूपवर आधारित आहे. चित्रपटाचा नायक आणि एक पोलिस अधिकारी एकाच दिवसांत पुन्हा पुन्हा जगताना दाखवले आहेत. प्रत्येक वेळी त्यांना परिस्थिती बदलण्याची संधी मिळते. (चित्रपटाचा स्क्रिनशॉट)

TOPICS
बॉलिवूडBollywoodभारतीय चित्रपटIndian CinemaमनोरंजनEntertainmentहॉलीवूडHollywood

Web Title: Indian sci fi movies top 10 hindi south sci fi films that compete with the best of hollywood see list kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.