-
शांती प्रिया
बॉलिवूडपासून ते दक्षिण चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवणारी अभिनेत्री शांती प्रिया हिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. (Photo: Indian Express) -
शांती प्रिया १९९१ मध्ये आलेल्या ‘सौगंध’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्या विरुद्ध अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. (Photo: Indian Express)
-
बॉलिवूड, साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम केले
हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री शांती प्रियाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. -
मुंडन केलेल्या लूकमध्ये फोटोशूट.
शांतीने टक्कल असलेल्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. छायाचित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेत्रीने तिचे केस काढून टाकले आहेत. -
नवऱ्याचा ब्लेझर घातला
त्याचबरोबर तिने तपकिरी रंगाचा ब्लेझर घातला आहे, जो तिला खूप चांगला सूट करत आहे. हा ब्लेझर तिच्या दिवंगत नवऱ्याचा आहे. -
महिलांना दिला खास संदेश
शांती प्रियाने तिच्या या लूकचे फोटो पोस्ट करताना खास कॅप्शन दिले आहे, तिने लिहिले, “अलीकडेच मी टक्कल केले आहे. यानंतर मला खूप काही नवं अनुभवता येत आहे. महिला म्हणून, आपण अनेकदा जीवनात मर्यादा घालतो, नियमांचे पालन करता करता आपण स्वतःला पिंजऱ्यात कैद करुन ठेवत असतो.” -
मी स्वतःला मुक्त केले
शांतीने पुढे लिहिले, “हा बदल करून मी स्वत:ला या पिंजऱ्यातून मुक्त केले आहे, जगाच्या व्याख्येतील सौंदर्याची मानक मोडण्याचा मी हा प्रयत्न केला आहे. मी हे करताना मी खूप धैर्याने आणि साहसी वृत्तीने वागले.” -
पतीची आठवण
तिच्या दिवंगत पतीची आठवण काढत शांती म्हणाली, “हा माझ्या नवऱ्याचा ब्लेझर आहे. यामधून आजही त्यांची उब जाणवते. प्रत्येक स्त्रीने ताकदीने उभा राहिले पाहिजे, खूप खूप प्रेम.” -
(सर्व फोटो साभार- शांती प्रिया इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : ‘Ground Zero’ फेम सई ताम्हणकरच्या काळ्या साडीतील फोटोशूटवर चाहते फिदा
१९९० मध्ये अक्षय कुमारबरोबर पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीने केलं मुंडन, बोल्ड फोटोशूट करत महिलांना दिला खास संदेश…
शांती प्रिया १९९१ मध्ये आलेल्या ‘सौगंध’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य नायकाच्या भूमिकेत होता.
Web Title: Akshay kumar actress shanthi priya goes bald in her latest photoshoot fans shocked to see her look spl