• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. why did veteran actress usha nadkarni says i couldnt watch my son grow up also shares why she work in age 79 nsp

“मला माझ्या मुलाला मोठं होताना बघता आलं नाही”, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी असं का म्हणाल्या?

Why Usha Nadkarni Work In Age 79: “आता या वयात…”, मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी काय म्हणाल्या?

May 31, 2025 09:59 IST
Follow Us
  • उषा नाडकर्णी यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ७९ व्या वर्षीही त्या काम करतात, याबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “आता या वयात मी फक्त बसून राहिले, तर माझे हात-पाय कडक होतील.
    1/9

    उषा नाडकर्णी यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ७९ व्या वर्षीही त्या काम करतात, याबाबत वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, “आता या वयात मी फक्त बसून राहिले, तर माझे हात-पाय कडक होतील.

  • 2/9

    “माझी आई ८३ व्या वर्षी गेली. तिनं कधीच मला बरं नाही, अशी तक्रार केली नाही. फक्त बसून राहिलं की, फक्त बसावंसं वाटतं.”

  • 3/9

    “काम करीत राहिलं की, काही वाटत नाही. घरी माझं जेवण मी करते, माझा डबा मी करते. शूटिंगला जाताना सकाळी ५ ला उठून मी माझं सगळं करते. डबा घेऊन जाते. त्यामुळे काम करण्याबद्दल काही वाटत नाही.

  • 4/9

    “तुम्ही त्याबद्दल अतिशयोक्ती केली, तर वाटतं. तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाहीत, तर काही वाटत नाही.”

  • 5/9

    पुढे उषा नाडकर्णी मुलाबाबत म्हणाल्या, “माझ्या मुलाचं आणि माझं नातं छान आहे. पण, लहानपणी मला त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही. कारण- मी एकाच वेळी नोकरी करायचे, शूटिंगदेखील करायचे, नाटकातदेखील काम करायचे.

  • 6/9

    “त्यामुळे मुलाला सांभाळणं, हा एक मोठा प्रश्न असतो. पण, माझ्या आईमुळे माझा तो प्रश्न सुटला. माझ्या मुलाचं सगळं माझ्या आईनं केलं.”

  • 7/9

    “आता मास्टरशेफमध्येसुद्धा मी बोलले की, मला माझ्या मुलाला मोठं होताना बघता आलं नाही. कारण- नाटक म्हटलं की, दिवस-रात्र सण असं काही नसतं. पळापळ असायची. अशा वेळी मुलांचे हाल होतात. आई निवृत्त झाली होती. त्यामुळे आईनं मुलाकडे लक्ष दिलं. त्यामुळे तो आई-पप्पांकडेच राहिला.

  • 8/9

    “माझ्या आईला तो आई म्हणायचा. तो मला म्हणतो की, तू मला जन्म दिलास; पण माझी आई ती आहे. माझे पप्पा लवकर गेले. माझा मुलगा सहा वर्षांचा असताना माझे वडील गेले. त्यानंतर माझ्या भावानं त्याचं सगळं केलं.”

  • 9/9

    दरम्यान, उषा नाडकर्णी या चित्रपट, मालिकांबरोबरच रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसल्या आहेत. ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वात त्या दिसल्या होत्या. तसेच नुकत्याच त्या सेलिब्रिटी मास्टरशेफच्या पहिल्या सीझनमध्येदेखील दिसल्या होत्या. आता आगामी काळात त्या कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य: उषा नाडकर्णी इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsमराठी सिनेमाMarathi Cinema

Web Title: Why did veteran actress usha nadkarni says i couldnt watch my son grow up also shares why she work in age 79 nsp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.