• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress kajal kate shares her weight loss journey loses 17 kg weight sva

मराठी अभिनेत्रीने घटवलं तब्बल १७.६ किलो वजन! ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हाल, ‘झी मराठी’च्या गाजलेल्या मालिकेत केलंय काम

“हा प्रवास सोपा नव्हता…”, म्हणत मराठी अभिनेत्रीने घटवलं तब्बल १७.६ किलो वजन, पोस्ट शेअर करत म्हणाली…

Updated: June 3, 2025 22:33 IST
Follow Us
  • kajal kate shares her weight loss journey loses 17 kg weight
    1/9

    अलीकडच्या काळात सगळेच सेलिब्रिटी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहेत.

  • 2/9

    ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच काजल काटे. तिने गेल्या वर्षभरात तब्बल १७.६ किलो वजन घटवलं आहे.

  • 3/9

    काजलने तिची वेट लॉस जर्नी आणि ट्रान्सफॉर्मेशनबद्दल पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

  • 4/9

    काजलने वजन कमी करण्याआधी ती कशी दिसायची आणि सध्या कशी दिसतेय याचे Before-After फोटो देखील शेअर केले आहेत. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झाले आहेत.

  • 5/9

    काजल म्हणते, “हा प्रवास फक्त वजन घटवण्याचा नव्हता…स्वत:मधील भीती, शंका आणि मला आयुष्यात मागे ठेवणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त होण्याचा होता. मी फक्त कॅमेऱ्यासाठी हे केलेलं नाहीये. तर, आजच्या काळात फिट राहणं गरजेचं आहे म्हणून हा निर्णय घेतला होता.”

  • 6/9

    या संपूर्ण वेट लॉस जर्नीमध्ये काजलला तिच्या पतीने खूप साथ दिली. यासह तिच्या न्यूट्रिशनिस्ट देखील मदत केली.

  • 7/9

    काजलने १० मे २०२४ ते १० मे २०२५ या वर्षभरात तब्बल १७.६ किलो वजन घटवलं आहे.

  • 8/9

    हा प्रवास अजूनही संपलेला नाहीये ध्येय अजून गाठायचंय, असं म्हणत इथून पुढेही आरोग्यावर विशेष लक्ष देणार असल्याचं काजलने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • 9/9

    दरम्यान, काजलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीच्या पतीचं नाव प्रतिक कदम असं आहे. तिचा पती मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. ( सर्व फोटो सौजन्य : काजल काटे इन्स्टाग्राम )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress kajal kate shares her weight loss journey loses 17 kg weight sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.