Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. 9 most scariest horror movies now on ott dont watch alone kvg

OTT वरील हे ९ हॉरर चित्रपट पाहून भीतीनं गाळण उडेल, एकट्यानं पाहू नका नाहीतर…

Netflix and Prime Must Watch Horro Films: हृदयाची धडधड वाढविणारे आणि भीतीच्या सावटाखाली तुमची झोप उडविणारे हे ९ भयपट तुम्ही पाहिलेत का? सबस्क्रिप्शन असेल तर लगेच पाहून घ्या.

Updated: June 22, 2025 18:54 IST
Follow Us

  • These 9 Chilling Movies on OTT Are Not for the Faint-Hearted
    1/10

    जर तुम्हालाही हॉरर चित्रपट पहायला आवडत असतील तर हे ९ नवीन हॉरर चित्रपट तुम्ही नक्कीच पाहू शकता. या चित्रपटांमध्ये तुम्हाला भीती, सस्पेन्स आणि मानसिक गोंधळाचं जबरदस्त मिश्रण पाहायला मिळेल. हे चित्रपट भीतीदायक तर आहेतच, पण तुमची रात्रीची झोपही उडवू शकतात. जर तुमच्यात हिंमत असेल तर हे चित्रपट तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्कीच समाविष्ट करा. (Still From Film)

  • 2/10

    Cuckoo (नेटफ्लिक्स/प्राइम व्हिडिओ)
    या चित्रपटात एका मुलीची कथा आहे. जी तिच्या कुटुंबासह आल्प्स पर्वतरांगांमध्ये स्थायिक होण्यासाठी जाते. तिथे तिला काही विचित्र आवाज ऐकू येतात आणि एक विचित्र स्त्री तिला भेटते. जिचा तिच्या भूतकाळाशी संबंध आहे. यातील रहस्ये उलगडत असताना, चित्रपट तुम्हाला चांगलाच घाबरवतो. (Still From Film)

  • 3/10

    In a Violent Nature (प्राइम व्हिडिओ)
    हा अनोखा स्लॅशर चित्रपट मारेकऱ्याच्या दृष्टिकोनातून दाखवला आहे. जॉनी नावाचा एक मृत माणूस विशिष्ट लॉकेटच्या शोधात जंगलात आलेल्या कॅम्पर्सची हत्या करतो. चित्रपटाची संथ गती, गडद आणि गुढ वातावरण आणि रक्तपाताच्या दृश्यांनी भरलेला हा चित्रपट हॉरर चित्रपटाची वेगळीच शैली मांडतो. (Still From Film)

  • 4/10

    Longlegs (अमेझॉन प्राइम व्हिडिओ)
    हा एक थ्रिलर हॉरर चित्रपट आहे, ज्यामध्ये एक महिला एफबीआय एजंट एका भयानक सिरीयल किलर प्रकरणाची चौकशी करते. ती या केसमध्ये खोलवर जाताना तिला तिच्या भूतकाळाशी संबंधित भयानक सत्य उमजतात. हा चित्रपट संथ गतीनं चालतो, परंतु त्याचा शेवट तुम्हाला धक्का देईल. (Still From Film)

  • 5/10

    MaXXXine (प्राइम व्हिडिओ)
    १९८० च्या हॉलिवूडच्या पार्श्वभूमीत घडणारा हा चित्रपट अभिनेत्री मॅक्सिन मिंकसची कथा सांगतो, जी यापूर्वी अनेक भयानक हत्याकांडातून वाचली आहे, परंतु आता एक नवीन सिरीयल किलर स्टारलेट्सना लक्ष्य करत आहे. हा चित्रपट १९७० च्या दशकातील टी वेस्टच्या ‘एक्स’ ट्रायलॉजीचा शेवटचा भाग आहे, जो ग्लॅमर आणि भयपट, रक्तपात आणि गडद रहस्यांनी भरलेला आहे. (Still From Film)

  • 6/10

    Mickey’s Mouse Trap (अमेझॉन प्राइम व्हिडिओ)
    हा एक हॉरर पॅरोडी चित्रपट आहे, ज्यामध्ये मिकी माऊसच्या मुखवटा घातलेला एक मारेकरी मित्रांच्या गटाला आर्केडमध्ये बंद करतो आणि त्यांना मारतो. वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला एक प्रँक रक्तपातात रूपांतर कसा होतो, याची ही कथा आहे. जर तुम्ही स्लॅशर चित्रपटांचे शौकीन असाल तर हा चित्रपट अवश्य पहा. (Still From Film)

  • 7/10

    Terrifier (प्राइम व्हिडिओ)
    हा एक भयानक स्लॅशर चित्रपट आहे. ज्यामध्ये आर्ट नावाचा एक क्रूर जोकर हॅलोविनच्या रात्री निष्पाप लोकांची निर्घृणपणे हत्या करतो. कथेवर जोर न देता या चित्रपटात फक्त हिंसाचार आणि रक्तपात आहे. हा चित्रपट विशेषतः अशा प्रेक्षकांसाठी आहे ज्यांना हिंसाचार पाहायला आवडतो. (Still From Film)

  • 8/10

    The Devil’s Bath (प्राइम व्हिडिओ)
    १८ व्या शतकातील ऑस्ट्रियामध्ये घडणारा हा मानसशास्त्रीय भयपट, कठोर धार्मिक नियम आणि लग्नाच्या जाळ्यात अडकलेल्या एका निराश महिलेची गोष्ट सांगतो. महिलेची मानसिक स्थिती बिघडते आणि ती एका धोकादायक धार्मिक विधीमध्ये अडकते, ज्याचे भयानक परिणाम चित्रपटात दिसतात. (Still From Film)

  • 9/10

    The Exorcism (अमेझॉन प्राइम व्हिडिओ)
    रसेल क्रो सारखे दिग्गज अभिनेते या चित्रपटात आहेत. ही एका अशा अभिनेत्याची कथा आहे, जो एका राक्षसी कथा असलेल्या चित्रपटाचं शूटिंग करत असतो. पण हळूहळू सेटवर विचित्र घटना घडू लागतात. तो अभिनय करत आहे की त्याला खरोखर भुतानं पछाडलं आहे? हे कळायला मार्ग नसतो. चित्रपटात पुढं पुढं अनेक रहस्य उलगडतात. (Still From Film)

  • 10/10

    Watchers (प्राइम व्हिडिओ/नेटफ्लिक्स)
    एक कलाकार आयर्लंडच्या जंगलात अडकते आणि एका रहस्यमय घरात पोहोचते. जिथे फक्त एकच नियम असतो, “Watchers नी तुम्हाला पाहू नये”
    वॉचर्स नेमके कोण आहेत? ते प्राणी, आत्मे किंवा आणखी कुणी आहेत? याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला हा भयानक थरारपट पाहावा लागेल. (Still From Film)

TOPICS
ओटीटी प्लॅटफॉर्मOTT PlatformबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentहिंदी चित्रपटHindi FilmहॉलीवूडHollywood

Web Title: 9 most scariest horror movies now on ott dont watch alone kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.