-
‘कांटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचं (Shefali Jariwala Death) हृदविकाराच्या झटक्यानं शनिवारी (२८ जून) निधन झालं. दोन लग्न झालेल्या शेफालीला आई होऊ न शकल्याची खंत होती. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
शेफाली जरीवाला आणि तिचा पती पराग त्यागी यांचं २०१४ साली लग्न झालं होतं. लग्न करण्यापूर्वी दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
शेफाली जरीवालाचं हे दुसरं लग्न होतं. शेफालीला आई व्हायचं होतं, याबद्दल तिनं अनेक मुलाखतीमध्ये बाळाबद्दलची भावना व्यक्त केली होती. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
आरोग्याविषयी काही अडचणी असल्यामुळे शेफाली जरीवालाला आई होता येत नव्हतं. मात्र एखादं मुल दत्तक घ्यावं, असं तिला मनोमन वाटत होतं. याबद्दल तिनं अनेकदा वाच्यता केली होती. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
“मूल जन्माला कुणीली घालू शकतं, पण मला वाटतं की जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना घराची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. प्रत्येकजण आपल्या मुलांवर प्रेम करतो, पण जो दुसऱ्याच्या मुलाला आपल्या घरात आणतो आणि त्याचे पालनपोषण करतो तो सर्वात महान आहे”, अशी भावना शेफालीनं पारस छाबराच्या शोमध्ये व्यक्त केली होती. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
शेफाली जरीवालाचं पहिलं लग्न फक्त ५ वर्ष टिकू शकलं. या नात्यातही तिला मूल होऊ शकलं नव्हतं. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
शेफाली जरीवाला आपल्या नात्यातील मुलांना नेहमीच प्रेम देत असे. या मुलांबरोबरचे तिचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
तसेच पती पराग त्यागीसह दरवर्षी नवरात्रीला ती कन्या भोजन आयोजित करत होती. यावेळी ती मुलींना प्रेमानं जेवू घालत असे. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
शेफालीनं मुल दत्तक घेण्याच्या जटील प्रक्रियेबाबतही भाष्य केलं होतं. भारतात मुल दत्तक घेण्यासाठी दोन ते तीन वर्ष लागतात. ही प्रक्रिया आम्ही सुरू केली होती, त्यातच लॉकडाऊन लागलं. तसेच नंतर बिग बॉसमुळं प्रक्रिया करता आली नाही. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
-
शेफालीनं असंही सांगितलं होतं की, मुल दत्तक घेण्याच्या तिच्या निर्णयाला कुटुंबानं पाठिंबा दिला नाही. परंतुल कालांतराने कुटुंबीय समजून घेतील आणि आपल्याला पाठिंबा देतील, असे तिला वाटत होते. (Photo – Instagram/ @shefalijariwala)
Shefali Jariwala Last Wish: ‘शेफाली जरीवालाला व्हायचं होतं आई’, मुल दत्तक घेण्याचं स्वप्न अधुरच राहिलं
Shefali Jariwala Baby Adoption: बॉलिवूडची अभिनेत्री आणि ‘कांटा लगा गर्ल’ फेम शेफाली जरीवालाच्या (४२) अकाली निधनानं बॉलिवूडला धक्का बसला. यानिमित्ताने शेफालीच्या आयुष्याशी निगडित अनेक पैलू समोर येत आहेत.
Web Title: Shefali jariwala wish to become a mother wanted to adopt a girl child dream remained unfulfilled see photos kvg