-
बिग बॉस फेम आणि कांटा लगा गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला २७ जूनच्या रात्री हे जग सोडून गेली. या बातमीने सर्वांनाच धक्का दिला कारण ती फक्त ४२ वर्षांची होती. दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु पोलिस इतर दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत. (Photo: Shefali/Instagram)
-
शेफालीच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. तथापि, असेही म्हटले जात आहे की शेफाली घेत असलेली औषधे देखील हृदयविकाराचे कारण असू शकतात. (Photo: Shefali/Instagram)
-
तपासादरम्यान, जेव्हा फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) टीम शेफालीच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांना घरातू ३ औषधे सापडली, जी शेफाली घेत होती. FSL टीमला तिच्या घरातून अँटी-एजिंग व्हाईल्स, व्हिटॅमिन इंजेक्शन्स आणि गॅस्ट्रिक औषधे सापडली आहेत. (Photo: Shefali/Instagram)
-
अँटी-एजिंग व्हाईल्स
तपासात असे समोर आले आहे की शेफाली गेल्या ७-८ वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी अँटी-एजिंग ट्रीटमेंट घेत होती. तिच्या घरात सापडलेली अँटी-एजिंग व्हाईल्स ही औषधे त्वचेची चमक वाढवण्यासाठी घेतली जातात. थोडक्यात सांगायचे तर, या औषधाचे काम त्वचेत सुधारणा करणे आहे. (Photo: Shefali/Instagram) -
व्हिटॅमिन इंजेक्शन्स
शेफाली व्हिटॅमिन इंजेक्शन्सदेखील घेत होत यामुळे शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता दूर होते. जेव्हा आहाराने व्हिटॅमिन्सची कमतरता पूर्ण करता येत नाही तेव्हा डॉक्टर हे इंजेक्शन्स लिहून देतात. (Photo: Shefali/Instagram) -
पोटाची औषधे
ती पोटाची औषधं देखील घेत होती, जी पचनसंस्थेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी घेतली जातात. (Photo: Shefali/Instagram) -
२७ जून रोजी शेफालीने तिच्या घरी पूजा केली होती आणि उपवासही ठेवला होता, असेही स्पष्ट झाले आहे. उपवासामुळे ती काहीच खाल्ले नव्हते व त्याचवेळी तिने अँटी-एजिंग व्हाईल्स देखील घेतली. (Photo: Shefali/Instagram)
-
पूजा झाल्यानंतर शेफालीने फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाल्ले. त्यानंतर लगेचच तिचा रक्तदाब कमी झाला आणि ती बेशुद्ध पडली. (Photo: Shefali/Instagram)
-
फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका आल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, शेफालीचे २८ जून रोजी कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सध्या अहवालाची सर्वांना प्रतिक्षा आहे. (Photo: Shefali/Instagram) हेही पाहा- Photos : करीना कपूरला बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण; पहिल्या चित्रपटातील ५ अनसीन फोटो शेअर करत म्हणाली…
शेफाली जरीवालाच्या घरी तपासादरम्यान सापडली ‘ही’ ३ औषधं; कशासाठी वापरली जातात?
कांटा लगा गर्ल शेफाली जरीवाला आता या जगात नाही. २७ जून २०२५ ला तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यावेळी पोलिसांना तिच्या घरातून ३ औषधे सापडली आहेत.
Web Title: These 3 medicines were found during a search of shefali jariwala s house what are they used for spl