-
आपल्या आईची सगळी स्वप्नं पूर्ण व्हावीत, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. सध्या मराठी कलाविश्वातील अशाच एका मायलेकीच्या जोडीची सर्वत्र चर्चा होत आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री रसिका धामणकर यांच्या लेकीने नुकतंच नवीन घर खरेदी केलं आहे.
-
रसिका धामणकर यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलीने नव्या घराच्या रुपात खास गिफ्ट दिलं आहे.
-
रसिका यांची लेक अंतराचं नव्या घराचं स्वप्न वयाच्या २८ व्या वर्षी पूर्ण झालं आहे. या मायलेकींनी संपूर्ण कुटुंबासह नुकताच नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
रसिका धामणकर यांची लेक अंतरा लिहिते, “लहानपणापासून मी एक स्वप्न पाहिलं होतं, ते म्हणजे माझं हक्काचं घर असावं. मी स्वत:च्या मनाशी निश्चय केला होता, जेव्हा मी पहिलं घर घेईन ते माझ्या आईचं असेल.”
-
“माझं घराचं स्वप्न वयाच्या २८ व्या वर्षी पूर्ण झालं. हे घर माझ्या आईसाठी आहे… आय लव्ह यू आई!”
-
अभिनेत्री रसिका धामणकर यांनी त्यांच्या नव्या घराची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
सध्या संपूर्ण कलाविश्वातून रसिका धामणकर व त्यांची मुलगी अंतरावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
-
रसिका धामणकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर ‘स्टार प्रवाह’च्या ‘लग्नाची बेडी’ या मालिकेतून त्या घराघरांत लोकप्रिय झाल्या. याशिवाय काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. ( सर्व फोटो सौजन्य : रसिका धामणकर व अंतरा विजय इन्स्टाग्राम )
लेक असावी तर अशी! मराठी अभिनेत्रीच्या मुलीने घेतलं नवीन घर; आईला ५० व्या वाढदिवसानिमित्त दिली खास भेट…; पाहा फोटो
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या लेकीने घेतलं नवीन घर, आईला दिली खास भेट; भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाली…
Web Title: Marathi actress rasika dhamankar daughter buys new house and gifted her see photos sva 00