• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dhanshree verma shares first post from dubai after ex husband yuzvendra chahal s publicly take on his divorce spl

“…मी कृतज्ञ आहे”; युजवेंद्र चहलच्या मुलाखतीनंतर धनश्री वर्मा दुबईत, सोशल मीडियावर व्यक्त केली भावना, चाहते म्हणाले, “शांतपणे दिलेलं उत्तर…”

धनश्रीने तिच्या दुबई ट्रिपचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वडापाव, पाणीपुरी खाताना दिसून येत आहे.

Updated: August 5, 2025 12:20 IST
Follow Us
  • Dhanashree Verma goes back to Dubai,Yuzvendra Chahal take on divorce
    1/12

    क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाला ४ महिने झाले आहेत. या महिन्यांत ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत. दोघांनीही २० मार्च रोजी अधिकृतपणे एकमेकांशी घटस्फोट घेतला. तेव्हापासून दोघांबद्दल सतत बातम्या येत आहेत.

  • 2/12

    घटस्फोटानंतर दोघेही त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाले. पण अलिकडेच युजवेंद्रने एका पॉडकास्टमध्ये घटस्फोटाबद्दल भाष्य केले. क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या या मुलाखतीनंतर, आता त्याची माजी पत्नी धनश्री वर्माने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

  • 3/12

    धनश्रीने तिच्या दुबई ट्रिपचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती वडापाव, पाणीपुरी खाताना दिसून येत आहे.

  • 4/12

    तसेच तिथल्या मंदिरात जाऊन सूर्यास्ताचा (Sunset) आनंद घेताना दिसत आहे.

  • 5/12

    तिने तिच्या पोस्टला दिलेलं कॅप्शनही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

  • 6/12


    कॅप्शन
    “मी खूप दिवसांनी दुबईला परतले…, मी इथेच वाढले आणि या शहरात माझ्या अनेक आठवणी आहेत. इथलं बदलतं रुप पाहून माझं मन आनंदित झालंय. हिंदू मंदिराला भेट देणं हा सर्वात खास आणि सुंदर क्षण आहे. इथे मला खूप शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. मी खूप काही शिकले, खूप काही अनुभवले आणि जुने दिवस पुन्हा अनुभवले. माझ्या भरभराटीबद्दल, माझ्या असण्याबद्दल आणि सगळ्याबद्दल मी कृतज्ञ आहे.” अशा शब्दात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • 7/12

    दरम्यान, तिची ही पोस्ट म्हणजे युजवेंद्र चहलला शांतपणे दिलेलं उत्तर आहे, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

  • 8/12

    तशा अनेक प्रतिक्रिया तिच्या या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

  • 9/12

    दरम्यान, घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान, चहलने एक टी-शर्ट घातला होता, ज्यावर “बी युअर ओन शुगर डॅडी” (Be Your Own Sugar Daddy) असं लिहिलं होतं. युजवेंद्रचा हा मेसेज धनश्रीला टोला लगावण्यासाठी होता, असं त्यावेळी म्हटलं गेलं होतं. त्यावर चहलने स्वतःच मेसेज देण्यासाठी तो टी शर्ट घातल्याची कबुली दिली आहे.

  • 10/12

    चहल मुलाखतीत म्हणाला…
    “मला ड्रामा करायचा नव्हता. पण मला फक्त एक मेसेज द्यायचा होता आणि तो मी टी-शर्ट घालून दिला.”

  • 11/12

    तो पुढे म्हणाला, “समोरून अशा काही गोष्टी घडल्या होत्या. खरं तर आधी माझी इच्छा नव्हती. पण मग जे घडलं त्यानंतर मी विचार केला की बास. आता मी मुद्दाम घालणार. मला कुणाची पर्वा नाही. मी कुणालाही शिवीगाळ गेली नाही, मला फक्त एक मेसेज द्यायचा होता,” असं युजवेंद्र म्हणाला.

  • 12/12

    दरम्यान, चहलच्या या स्पष्टीकरणावर धनश्रीने थेट कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, चाहते तिच्या या पोस्टला शांत, सुंदर प्रतिक्रिया मानत आहेत. तिच्या फोटोंमध्ये ती हसत, खेळत, शांतता अनुभवताना दिसत आहे. चाहत्यांचं म्हणणं आहे की तिची ही पोस्ट मुव्ह ऑन करण्याची चांगली वृत्ती दाखवत आहे. (सर्व फोटो साभार- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम) हेही पाहा- पिवळे दात, सुजलेल्या हिरड्या आणि पायरियामुळे त्रस्त आहात का? आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितला प्रभावी उपाय, दात मोत्यासारखे चमकतील…

TOPICS
क्रीडाSportsबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsयुजवेंद्र चहलYuzvendra Chahal

Web Title: Dhanshree verma shares first post from dubai after ex husband yuzvendra chahal s publicly take on his divorce spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.