-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नुकतीच १२ ज्योतिर्लिंग यात्रा (12 Jyotirlinga Yatra) पूर्ण केली.
-
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत प्राजक्ता म्हणाली ‘आज वाढदिवसाचं औचित्य साधून, भीमा नदीच्या काठी, निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे सहकुटुंब दर्शन घेऊन १२ ज्योतिर्लिंग यात्रा पुर्ण केली’.
-
भारतात १२ ज्योतिर्लिंगांना खूप महत्त्व आहे. सोरटी सोमनाथ, महांकालेश्वर, श्रीशलि, ओंकारमांधता, भीमाशंकर, परळी वैजनाथ, रामेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ, केदारनाथ, घृष्णेश्वर अशी १२ ज्योतिर्लिंगे आहेत. भगवान शंकाराची पूजा करणारे अनेक भाविक या १२ ज्योतिर्लिंगांचे आवर्जून दर्शन घेतात. दरवर्षी मोठ्या संख्येने यात्रेकरू या ठिकाणांना भेट देतात.
-
श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग. वेरावळ, सौराष्ट्र- गुजरात.
-
श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग- द्वारका, गुजरात.
-
श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – खण्डवा, मध्य प्रदेश. नर्मदा नदीमध्ये मंधाता किंवा शिवपूरी बेटांवर वसलेलं स्वयंभू शिवलिंग, या द्विपाचा आकार ॐ सारखा आहे.
-
श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. – उज्जैन, मध्य प्रदेश.
-
श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग- छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)
-
श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग – नाशिक, महाराष्ट्र.
-
श्री काशी विश्वनाथ- काशी/वाराणसी/बनारस – उत्तर प्रदेश.
-
श्री मल्लिकार्जून ज्योतिर्लिंग – श्री शैलम् – आंध्रप्रदेश.
-
श्री भीमा शंकर ज्योतिर्लिंग – पुणे, महाराष्ट्र.
-
श्री रामेश्वरम् ज्योतिर्लिंग – रामनाथपुरम् – तमिळनाडू.
-
श्री केदारनाथ – रुद्रप्रयाग – उत्तराखंड.
-
श्री परळी वैजनाथ – बीड, महाराष्ट्र.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Photos: प्राजक्ता माळीने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंग यात्रा; फोटो शेअर करत म्हणाली, ‘भीमा नदीच्या काठी…’
भारतात १२ ज्योतिर्लिंगांना खूप महत्त्व आहे. सोरटी सोमनाथ, महांकालेश्वर, श्रीशलि, ओंकारमांधता, भीमाशंकर, परळी वैजनाथ, रामेश्वर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढ्या नागनाथ, केदारनाथ, घृष्णेश्वर अशी १२ ज्योतिर्लिंगे आहेत. भगवान शंकाराची पूजा करणारे अनेक भाविक या १२ ज्योतिर्लिंगांचे आवर्जून दर्शन घेतात.
Web Title: Marathi actress prajakta mali completed 12 jyotirlinga yatra darshan shravan 2025 shared photos on instagram sdn