-
बॉलीवूडची ग्लॅमरस, सुंदर, मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच माधुरी दीक्षित. तिला मनोरंजन विश्वात ‘धकधक गर्ल’ म्हणूनही ओळखलं जातं.
-
माधुरीने काही दिवसांपूर्वीच बेबी पिंक रंगाची सुंदर साडी नेसून खास फोटोशूट केलं होतं.
-
सुंदर साडी, त्यावर नेकलेस, केसात गुलाबाची फुलं या लूकमध्ये माधुरीचं सौंदर्य आणखी खुललं होतं.
-
माधुरी दीक्षितने पीच पाम ब्लूम्स टिश्यू साडी ( Peach Palm Blooms Tissue Sare ) नेसली आहे.
-
सध्या टिश्यू साड्यांचा नवीन फॅशन ट्रेंड सुरू आहे.
-
माधुरीची ही साडी तिच्या चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.
-
माधुरीची ही साडी लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबाने तिच्या ‘हाऊस ऑफ मसाबा’ या ब्रँड अंतर्गत डिझाईन केली आहे.
-
माधुरीने नेसलेल्या या गुलाबी टिश्यू साडीची किंमत ‘हाऊस ऑफ मसाबा’च्या अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्यानुसार ३० हजार रुपये एवढी आहे.
-
दरम्यान, हीच सुंदर साडी नेसून माधुरीने ‘शेकी’ गाण्यावर खास डान्स केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित इन्स्टाग्राम )
गुलाबी टिश्यू साडीत खुललं माधुरी दीक्षितचं सौंदर्य! ‘या’ खास व्यक्तीने डिझाईन केलीये साडी, किंमत ऐकून थक्क व्हाल…
माधुरी दीक्षितचा गुलाबी साडीत पारंपरिक लूक, साडी कोणी डिझाईन केलीय? जाणून घ्या…
Web Title: Madhuri dixit tissue saree designed by masaba gupta know the price sva 00