• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. titeeksha tawde went to kokan with sister actress khushboo tawde shares photos of hometown and ganpati festival sva

सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…

मराठी कलाविश्वातील ‘या’ दोन अभिनेत्री आहेत सख्ख्या बहिणी; गणपतीच्या सणानिमित्त पोहोचल्या गावी, शेअर केले सुंदर फोटो…

Updated: September 4, 2025 19:30 IST
Follow Us
  • titeeksha tawde went to kokan with sister actress khushboo tawde shares photos
    1/9

    मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकार गणपतीच्या सणाला त्यांच्या गावी कोकणात जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही छाया कदम, निखिल बने, अंशुमन विचारे यांसारखे अनेक कलाकार कोकणात गेले होते. याचबरोबर अभिनेत्री तितीक्षा तावडेने सुद्धा गौरी-गणपतीचा सण तिच्या माहेरी साजरा केला.

  • 2/9

    तितीक्षाचं माहेर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असरोंडी येथे आहे. आपल्या आई-बाबांसह अभिनेत्री अनेकदा माहेरी कोकणात जाते.

  • 3/9

    गणेशोत्सवानिमित्त तितीक्षा आणि तिची मोठी बहीण अभिनेत्री खुशबू तावडे या दोघीही कोकणात गेल्या आहेत.

  • 4/9

    तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये खुशबूच्या मुलांची झलकही पाहायला मिळत आहे.

  • 5/9

    अभिनेत्रीने युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत तिच्या संपूर्ण असरोंडी गावची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

  • 6/9

    तितीक्षाचं माहेर खूपच सुंदर आहे. याठिकाणी त्यांचं सुंदर असं कौलारू घर आहे. मोठ्या प्रशस्त अंगणात छानसा झोपाळा आहे. अभिनेत्रीच्या घराजवळील निसर्गरम्य परिसर सर्वांचं लक्ष वेधून घेतो.

  • 7/9

    तितीक्षा व खुशबू या दोघींनी माहेरी गौरी-गणपतीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला. पारंपरिक पद्धतीने तावडे कुटुंबीयांच्या घरी गौराईचं आगमन झालं. सगळ्या कुटुंबीयांनी मिळून गौराई अन् गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्याचं अभिनेत्रीच्या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.

  • 8/9

    तितीक्षाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये गौरी विसर्जनाची परंपरा, कोकणातील संस्कृती याची झलक पाहायला मिळत आहे.

  • 9/9

    तितीक्षा व खुशबू यांच्या असरोंडी गावचे सुंदर फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. याशिवाय कोकणातील गणेशोत्सवाची झलक शेअर केल्याने चाहत्यांनी अभिनेत्रीचे आभारही मानले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे व खुशबू तावडे इन्स्टाग्राम )

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Titeeksha tawde went to kokan with sister actress khushboo tawde shares photos of hometown and ganpati festival sva 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.