-
यंदा गणेशोत्सवात अनेक मराठी सेलिब्रिटींनी कोकणदौरा केल्याचं पाहायला मिळालं.
-
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनघा अतुल सुद्धा नुकतीच कोकणात गेली होती.
-
अनघा अतुल ही पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांची लेक आहे. ती नुकतीच रत्नागिरी फिरायला गेली होती.
-
यावेळी अनघाने गणपतीपुळे मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं.
-
गणपतीपुळ्याच्या मंदिर परिसरातील अनेक फोटो अनघाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अनघाने शेअर केलेल्या या फोटोंवर एक खास कमेंट करण्यात आली आहे. पहिल्याच फोटोमध्ये ती उंदीर मामाच्या कानात काहीतरी इच्छा मागत असल्याचं पाहायला मिळत आहे.
-
तिचा फोटो पाहून “उंदराच्या कानात काय सांगितलं?” असा प्रश्न तिला एकाने विचारला. यावर तिने “मला लवकर रिप्लाय करण्याची शक्ती दे” असं हटके उत्तर दिलं आहे.
-
याशिवाय अनघाच्या अन्य चाहत्यांनी “गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल” असंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे. बाप्पाचं दर्शन घेताना अनघाने पारंपरिक लूक केल्याचं पाहायला मिळालं.
-
अनघाचे हे फोटो सर्वांच्या पसंतीस उतरले आहेत. ( फोटो सौजन्य : अनघा अतुल इन्स्टाग्राम )
भगरे गुरुजींची लेक पोहोचली कोकणात! ‘या’ प्रसिद्ध मंदिरात घेतलं दर्शन, “उंदराच्या कानात काय सांगितलं?” या प्रश्नावर म्हणाली…
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री पोहोचली कोकणात, शेअर केले सुंदर फोटो, ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष…
Web Title: Bhagare guruji daughter anagha atul went to kokan ganpatipule shares photo sva 00