-
‘सारं काही तिच्यासाठी’, ‘आम्ही दोघी’, ‘देवयानी’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमुळे अभिनेत्री खुशबू तावडे घराघरांत लोकप्रिय झाली.
-
खुशबूचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्रीने ५ सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा केला.
-
यंदा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खुशबू तावडे आपल्या माहेरी कोकणात गेली होती. याचदरम्यान वाढदिवस असल्याने खुशबूने तिचा बर्थडे यावर्षी कोकणात साजरा केला.
-
खुशबूने बर्थडे कसा साजरा केला याची झलक इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सर्वांना दाखवली आहे.
-
“Birthday 2025 – तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम आणि शुभेच्छा दिल्या याबद्दल मी तुमचे आभार मानते” असं कॅप्शन देत खुशबूने वाढदिवसाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. खुशबू बर्थडेसाठी कुटुंबीयांसह कोकणातील एका रिसॉर्टवर गेली होती.
-
खुशबू तिच्या दोन्ही मुलांसह आणि लोकप्रिय अभिनेत्री व खुशबूची धाकटी बहीण तितीक्षा यांच्यासह कोकणात आली होती.
-
खुशबूचं गाव असरोंडी ( कणकवली ) याठिकाणी आहे.
-
अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये उकडीच्या मोदकांची झलक देखील पाहायला मिळत आहे.
-
तर, खुशबूने शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये ती लेकासह वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतंय. आता मुलीच्या जन्मानंतर खुशबू रुपेरी पडद्यावर केव्हा कमबॅक करणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : खुशबू तावडे इन्स्टाग्राम )
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने कोकणात साजरा केला वाढदिवस! ‘या’ ठिकाणी आहे गाव, शेअर केले सुंदर फोटो
‘सारं काही तिच्यासाठी’ फेम लोकप्रिय अभिनेत्रीने कोकणात साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो…
Web Title: Marathi actress khushboo tawde celebrated birthday in kokan with family shares photo sva 00