Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh utsav 2022 shiv sena leader aditya thackeray visited various supporters home and lalbagh cha raja with ex cm uddhav thackeray scsg

कार्यकर्त्यांच्या घरापासून ‘लालबागच्या राजा’पर्यंत; आदित्य ठाकरेंनी आई-वडिलांसहीत अनेक ठिकाणी घेतलं गणरायांचं दर्शन; पाहा खास Photos

दुपारी अडीच वाजल्यापासून रात्री जवळजवळ १० वाजेपर्यंत आदित्य ठाकरे हे वेगवगेळ्या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले.

Updated: September 1, 2022 17:31 IST
Follow Us
  • Ganesh Utsav 2022 Shiv Sena Leader Aditya Thackeray Visited Various Supporters home and Lalbagh Cha Raja With Ex CM Uddhav Thackeray
    1/33

    गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं.

  • 2/33

    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, या ट्वीटच्या खाली आदित्य यांनी दिवसभरामध्ये कोणाकोणाच्या घरी आणि लालबागच्या राजासहीत इतर मोठ्या मंडळांना भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 3/33

    शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तिकर यांच्या घरच्या विघ्नहर्त्याचे दर्शन घेतल्याचं ट्वीट आदित्य यांनी दुपारी अडीचच्या सुमारस केलं.

  • 4/33

    आमदार सुनील प्रभू यांच्या घरीही आदित्य ठाकरे गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते.

  • 5/33

    आदित्य यांनी सुनील प्रभूंच्या घरातील गणपतीचं दर्शन घेताना फोटो पोस्ट केला असून त्यामध्ये भिंतीवरील उद्धव ठाकरेंचा फोटो विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

  • 6/33

    आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी जाऊनही आदित्य ठाकरेंनी गणरायाचं दर्शन घेतलं.

  • 7/33

    पत्रकार साहिल जोशी यांच्या घरी जाऊनही आपण गणेशाचे दर्शन घेतल्याचं आदित्य यांनी ट्विटरवरुन फोटो पोस्ट करत म्हटलं आहे.

  • 8/33

    युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या घरीही आदित्य ठाकरेंनी गणपती दर्शनासाठी हजेरी लावली.

  • 9/33

    युवासेना कार्यकारिणी सदस्य राहुल कनल यांच्या घरीही आदित्य ठाकरे गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले.

  • 10/33

    अजय चौधरी यांच्या घरीही आदित्य ठाकरेंनी गणेश दर्शनसाठी हजेरी लावली.

  • 11/33

    शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या घरी जाऊन आदित्य ठाकरेंनी वरदविनायकाचे दर्शन घेतले असं ट्विटरवरुन म्हटलं आहे.

  • 12/33

    युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव यांच्या घरीही आदित्य ठाकरे गणपतीनिमित्त गेले होते.

  • 13/33

    शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर यांच्याही घरी आदित्य ठाकरे गणेश दर्शनासाठी पोहोचले होते.

  • 14/33

    मिर्लेकर यांच्या कुटुंबियांसोबतचा फोटोही आदित्य यांनी शेअर केला आहे.

  • 15/33

    मयुरेश गणपत्ये यांच्या घरच्या गणेशाचंही आदित्य यांनी दर्शन घेतलं.

  • 16/33

    विशाल गुप्ता यांच्या घरी जाऊन महागणपतीचे दर्शन घेतले, असं म्हणत आदित्य यांनी हा फोटो शेअर केला आहे.

  • 17/33

    युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतल्याचं आदित्य यांनी म्हटलं आहे.

  • 18/33

    रात्री नऊच्या सुमारास आदित्य ठाकरे हे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले.

  • 19/33

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासह सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, अशा कॅप्शनसहीत आदित्य ठाकरेंनी फोटो शेअर केले आहेत.

  • 20/33

    यावेळी मंडळाकरुन शिवसेना पक्षप्रमुखांचा सत्कार झाल्याचा फोटोही आदित्य यांनी पोस्ट केला आहे.

  • 21/33

    एका फोटोमध्ये आदित्य लालबागच्या राजाच्या डाव्या पायावर डोकं टेकवून दर्शन घेताना दिसत आहेत.

  • 22/33

    लालबागचा राजा मंडळानेही ट्विटरवरुन ठाकरे कुटुंबियांनी राजाचं दर्शन घेतल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 23/33

    उद्धव ठाकरे राजाच्या पायाला हात लावून दर्शन घेताना हा फोटो मंडळानेच पोस्ट केला आहे.

  • 24/33

    उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या लालबागच्या राजाच्या पाया पडतानाचा हा फोटोही लालबागच्या राजाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

  • 25/33

    मंडळाकरुन उद्धव ठाकरेंचा सत्कार करत मंडळाच्या कामाची पुस्तिकाही देण्यात आली.

  • 26/33

    दुपारी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी गणरायांचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी आदित्य ठाकरेंनी सहकुटुंब सहपरिवार मुंबईतील काही मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सवांना हजेरी लावली.

  • 27/33

    यावेळी आदित्य यांचे वडील तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य यांच्या आई रश्मी ठाकरे, धाकटे बंधू तेजस ठाकरेही उपस्थित होते.

  • 28/33

    मुंबईच्या राजाचं दर्शन घेताना हा फोटो आदित्य यांनी शेअर केला आहे.

  • 29/33

    मुंबईच्या राजाच्या मूर्तीचा फोटोही आदित्य यांनी शेअर केला आहे.

  • 30/33

    चिंचपोकळीमधील सार्वजनिक गणेश उत्सवालाही आदित्य ठाकरेंनी सहकुटुंब हजेरी लावली.

  • 31/33

    चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेतले, या कॅप्शनसहीत आदित्य यांनी काही फोटो शेअर केले आहेत.

  • 32/33

    आदित्य यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. आदित्य यांनीच अखेर ही सेल्फी काढण्याची आपल्या चाहत्यांची इच्छी अशी पूर्ण केली.

  • 33/33

    आदित्य यांनी चिंतपोकळीच्या चिंतामणीच्या मूर्तीचाही फोटो शेअर केला आहे.

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025शिवसेनाShiv Sena

Web Title: Ganesh utsav 2022 shiv sena leader aditya thackeray visited various supporters home and lalbagh cha raja with ex cm uddhav thackeray scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.