• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. pune five manache ganpatis immersion procession ganesh visarjan pvp

Photos: ढोल-ताशांचा नाद, आकर्षक रांगोळी, भव्य मिरवणूक; पुण्यातील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुक पाहण्यास विविध भागातून हजारोच्या संख्येने भाविक येत असतात.

Updated: September 28, 2023 16:50 IST
Follow Us
  • Pune-five-Manache-Ganpati-immersion-procession
    1/19

    वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता आज होत आहे.

  • 2/19

    पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुक पाहण्यास विविध भागातून हजारोच्या संख्येने भाविक येत असतात.

  • 3/19

    दहा दिवस संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरणासह चैतन्य निर्माण करणाऱ्या गणरायाला विसर्जन मिरवणुकीने निरोप देण्यात येत आहे. राज्यभरातील भाविक या मिरवणुकीमध्ये दाखल होतात.

  • 4/19

    या सोहळ्यातील भव्य देखावे, आकर्षक रोषणाई, ढोल-ताशा पथकाच्या तालावर नाचणारी तरुणाई मिरवणुकीचे आकर्षण असते.

  • 5/19

    मिरवणुकीत भव्य देखावे अनेक मंडळांकडून साकारण्यात येतात. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या मार्गांवरून मंडळे विसर्जन मिरवणूक सोहळ्यात दाखल होतात.

  • 6/19

    आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौक येथून मानाचा पहिला कसबा गणपतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आरती करून सुरूवात झाली आहे.

  • 7/19

    त्यानंतर मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाची मिरवणुक पालखीमधून टिळक चौक,बेलबाग चौक तेथून पुढे अलका टॉकीज चौकाच्या दिशेने न्यू गंधर्व ब्रास बँड,शिवमुद्रा आणि ताल ढोल ताशांच्या गजरात मार्गस्थ झाली.

  • 8/19

    मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाची मिरवणुक बेलबाग चौकातून अलका टॉकीज चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील गुलालाची उधळण करीत मिरवणुक मार्गस्थ झाली.

  • 9/19

    मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाची विसर्जन मिरवणुक महाकाल रथामधून काढण्यात आली.

  • 10/19

    मानाचा पाचवा केसरी गणेशोत्सव मंडळ

  • 11/19

    विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

  • 12/19

    गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीची सांगता २८ तास २९ मिनिटांनी झाली. यंदा विसर्जन मिरवणूक किती तास सुरू राहणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

  • 13/19

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत प्रथमच दुपारी चार वाजता सहभागी होणार आहे. त्यामुळे यंदा मिरवणूक लवकर संपेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

  • 14/19

    गणेशोत्सवपूर्वी इटली येथील अ‍ॅना मारा या तरुणीने श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडामध्ये मर्दानी खेळाचे प्रशिक्षण घेतले होते.

  • 15/19

    या तरुणीने आज विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन प्रात्यक्षिक सादर करून पुणेकर नागरिकांची मने जिंकली.

  • 16/19

    पुण्यातील गणेशोत्सवा मधील विसर्जन मिरवणुकीकडे पुणेकर नागरिकांचे दरवर्षी लक्ष लागून असते. या मिरवणुकीत शहरातील विविध संस्था आणि संघटना मिरवणुक पाहण्यास येणार्‍या नागरिकांना सेवा देण्याच काम करीत असतात.

  • 17/19

    पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमी ही संस्था २५ व्या वर्षाती पदार्पण करीत आहे. या संस्थेमार्फत आजवर मंडई चौक ते अलका टॉकीज चौकादरम्यान येणार्‍या ११ चौकात सामाजिक विषयावर रांगोळ्या साकारून नागरिकाचे प्रबोधन करण्याच काम केले आहे.

  • 18/19

    यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा कायम राखत सायबर क्राईमवर आधारित भव्य अशा रांगोळ्या साकारल्या आहेत. पुणेकर नागरिकांनी रांगोळ्या पाहण्यास एकच गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे.

  • 19/19

    विसर्जन मिरवणूक सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी शहर, तसेच उपनगरात शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त विसर्जन मार्गासह शहरातील विविध भागात तैनात करण्यात आला आहे.

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalगणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Pune five manache ganpatis immersion procession ganesh visarjan pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.