• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. shikhandi maharashtras first transgender dhol tasha pathak made debut with the shrimant bhausaheb rangari ganesh mandal in pune on saturday snk

Ganesh Utsav 2024 : महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथक ‘शिखंडी’ने भाऊ रंगारी गणपतीसमोर सादर केले वादन

Pune First Shikhandi Dhol Tasha Pathak : पुण्यातील गणेशोत्सवात महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथक ‘शिखंडी’ने वादन सादर केले.

September 8, 2024 11:23 IST
Follow Us
  • The 25-member Shikhandi, Maharashtra’s first transgender Dhol Tasha Pathak made debut with the Shrimant Bhausaheb Rangari Ganesh Mandal in Pune on Saturday.
    1/10

     Ganesh Utsav 2024 Transgender Dhol Tasha: Pathak  : पुण्यात जवळपास २०० हून अधिक ढोल-ताशा पथकं आहेत ,ज्यामध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. पण, आता या ढोल-ताशा पथकांमध्ये तृतीयपंथींच्या ढोल-ताशा पथकाचा समावेश झाला आहे. हे फक्त पुण्यातील नव्हे तर भारतातील पहिले ढोल-ताशा पथक ठरणार आहे. (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)

  • 2/10

    शिखंडी : पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक
    राज्यातील पहिल्या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाचे नाव शिखंडी असे ठेवण्यात आलं आहे (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)

  • 3/10

    महाभारतातील एका योद्ध्याच्या नावावरून ‘शिखंडी’ असे नाव देण्यात आले, जी एक राजकुमारी म्हणून जन्मली परंतु एक माणूस म्हणून लढली (सौजन्य – इंस्टाग्राम, shikhandi_dhol_tasha_pathak)

  • 4/10

    ढोल ताशा पथकाची स्थापना सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी शेख यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आणि मनस्वी गोयलकर, प्रवीण सोनवणे, प्रितेश कांबळे आणि मन्नत यांनी मार्गदर्शन केले. (सौजन्य – इंस्टाग्राम, shikhandi_dhol_tasha_pathak)

  • 5/10

    “आमच्यापैकी कोणालाच वाद्ये कशी वाजवायची हे माहित नव्हते किंवा आमच्याकडे प्रवेश नव्हता,” संस्थापक सदस्य प्रवीण सोनवणे यांनी शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळासोबत गटाच्या पदार्पणापूर्वी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. (सौजन्य – इंस्टाग्राम, shikhandi_dhol_tasha_pathak)

  • 6/10

     तृतीयपंथीयांनी एकत्र येऊन स्वत:च ढोल-ताशा वादन शिकले आहे. यंदा पुण्यातील गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदाच या तृतीयपंथी ढोल-ताशा पथकाने वादन सादर केले. (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)

  • 7/10

    पुण्यातील प्रसिद्ध ढोल-ताशा पथक नादब्रह्म यांनी खारीचा वाटा उचलला आहे. शिखंडी ढोल-ताशा पथकातील तृतीयपंथी वादकांना नादब्रह्म पथकाने ढोल-ताशा वादनाचे प्रशिक्षण दिले. (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)

  • 8/10

    डॉक्टर रश्मी बापट यांनी ढोल मिळवून दिले. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीदेखील या पथकाला मदत केली.” (सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)

  • 9/10

    २५ जणांच्या या तृतीय पंथीय ढोल ताशा पथकने शनिवारी पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या बाप्पाासमोर वादन सादर केले.(सौजन्य – एक्सप्रेस फोटो पवन खेंगरे)

  • 10/10

    बाप्पासमोर पहिल्यांदा ढोल-ताशा वादन करण्याची संधी मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. (सौजन्य – इंस्टाग्राम, shikhandi_dhol_tasha_pathak)

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025पुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Shikhandi maharashtras first transgender dhol tasha pathak made debut with the shrimant bhausaheb rangari ganesh mandal in pune on saturday snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.