-
आज सगळीकडे गणेश चर्तुथीचा सण साजरा केला जात आहे. घरोघरी ते सार्वजनिक ठिकाणी आज बाप्पाचं आगमन झालं आहे.
-
दरम्यान भारतीय क्रिकेटपटू झहीर खानने देखील आपल्या घरी गणेशाची मनोभावे पूजा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
झहीर खानची पत्नी ‘चक दे इंडिया’ फेम मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आहे.
-
सागरिका आणि झहीर अनेक सण घरात अगदी आनंदाने साजरा करत त्याचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असतात.
-
गणेश चतुर्थीच्या खास दिवशी सागरिका आणि झहीरने त्यांच्या ४ महिन्यांच्या मुलाचा फोटो पहिल्यांदाच चाहत्यांसह शेअर केला आहे.
-
फतेहसिंह बाप्पासमोरचा मोदक उचलण्याचा प्रयत्न करतानाचा गोड फोटो आहे.
-
सागरिका, जहीर आणि फतेहसिंह यांचा छान कुटुंबाचा फोटोदेखील शेअर केला आहे.
-
सागरिका आणि झहीर यांनी सहकुटुंब घरच्या घरी गणरायाची मनोभावे पूजा करत सण साजरा केला.
झहीर खानने साजरा केला गणेशोत्सव, मराठमोळ्या सागरिकाने केली पूजा; चिमुकल्या फतेहसिंहचा मोदक घेतानाचा फोटो पाहिलात का?
Zaheer Khan Sagarika Ghatge Ganesh Chaturthi Celebration: भारताचा माजी खेळाडू झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसह घरात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला आहे. या शुभ दिवशी सागरिका आणि झहीर खानने आपल्या लेकाचे फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.
Web Title: Zaheer khan and sagarika ghatge celebrates ganesh chaturthi 2025 with son fatehsinh khan see photos bdg